स्वामी विवेकानंद अरूणोदय, प्राथमिक विभागाची विज्ञान भरारी
E- टोल प्लाझा प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड
डोंबिवली : स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक विभागाच्या E- टोल प्लाझा या प्रकल्पाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दुसरा क्रमांक पटकावल्याने त्यांची जिल्हा स्तरावर निवड झालीय. केडीएमसीच्या शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर- घोलप, प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती चौधरी आणि शाळेचे विद्यार्थी रोहित माळी, हर्ष खोचरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साकेत महाविद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख पिऊली भट्टाचार्य, एपीजे अब्दूल कलाम कल्पक केंद्राचे मिलिंद चौधरी आदी उपस्थित होते.
केडीएमसीच्या शिक्षण विभागाच्यावतीने महापालिकेच्या समुह केंद्राच्या माध्यमातून कल्याण खडकपाडा येथील ट्री हाऊस शाळेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २२५ शाळांनी प्रदर्शनात सहभाग घेतला होता. यामध्ये महापालिकांच्या शाळेबरोबरच खासगी ६७ शाळांचा समावेश होता. डोंबिवली पश्चिमेतील स्वामी विवेकानंद अरूणोदय प्राथमिक शाळेच्या विद्याथ्र्यांनी E- टोल प्लाझा हा प्रकल्प तयार केला होता. जुन्या चुकीच्या टोल पध्दतीमुळे होणारे तोटे आणि नव्या पध्दतीच्या ई टोल प्लाझामुळे होणारे फायदे असा हा प्रकल्प मांडण्यात आला हेाता. टोल नाक्यावरील होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी वाहनांना दुरसंवेदक बसविला तर टोल नाक्यावरील दूरसंवेदक सक्रिय होऊन काही सेकंदात वाहन चालकाच्या बँक खात्यामधून टोलवसुली कंपनीच्या खात्यात पैसे जमा होतील व वाहन तात्काळ पुढे निघून जातील. टोल नाक्यावरील प्रत्येक रांगेत ही सुविधा उपलब्ध करून दिल्यास टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी राहणार नाही. तसेच वाहनांचा खोळंबा न होता वेळ आणि पैसा अशी दोन्हीची बचत होईल असा हा प्रकल्प होता. याबरोबरच घरातील टाकाऊपासून टिकाऊ वस्तू , कच- याची समस्या पाण्याची बचत, ऊर्जा निर्मिती असे विविध प्रकल्पही विद्याथ्र्यांन साकारले होते.या प्रदर्शात ६७ शाळेतील १३० विद्यार्थी व ७० शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
खूपच छान. असे प्रकल्प होणे भाविकाऴासाठी आवश्यक आहे .