स्टोरी मिररकडून देशभरतील शाळेत लेखन स्पर्धेचे आयोजन 
 स्पर्धेसाठी ४० लाख रुपयांची पारितोषिक
मुंबई :  स्टोरी मिररने भारतातील सर्वात मोठी शाळा लेखन स्पर्धा २०१८ (एसएसडब्ल्यूसी २०१८) जाहीर केली आहे. शाळांमधील पहिल्या १०० लेखकांना शोधणे हा यामागचा हेतू आहे. यासाठी ४० लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. शाळांमध्ये सामान्यत: विद्यार्थ्याना सांस्कृतिक उपक्रमांमध्येच बंदिस्त केले जात आहे. त्यामुळं स्टोरी मिररने  अशा प्रकारचे साहित्याचे स्पर्धा घेण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यामुळं विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आत्मचिंतनही करता येईल. व स्वतःच्या लेखनगुणांना वाव देता येणार आहे. ही  स्पर्धा ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत राहील.
 एसएसडब्ल्यूसी २०१८ ही चौथी आणि बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमधून इंग्रजी तसेच हिंदीतील कथांचे आणि कवितांचे सादरीकरण करता येणार आहेत. याशिवाय, सर्व शिक्षकांसाठी एक वेगळी स्पर्धा श्रेणी देखील यात समाविष्ट असेल. स्टोरी मिररचा  जवळपास १० हजार हून अधिक शाळापर्यंत पोहोचण्याचा मानस आहे. सुमारे ३ लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभागी करून घेण्यासाठी एसएसडब्ल्यूसी २०१८ ची कल्पना आहे. यस बँक आणि किडझनीय यांच्या सहकार्याने स्पर्धेसाठी ४० लाख रुपयांची पारितोषिक जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर यात शिक्षकही समाविष्ट आहेत. स्टोरी मिरर विद्यार्थ्यांच्या जीवनात चांगले सल्लागार म्हणून शिक्षकांच्या अथक प्रयत्नांचा गौरव करीत आहे.
स्टोरी मिरर (https://storymirror.com) हे वाचक आणि लेखकांसाठी भारतातील सर्वात वेगवान वाढणारे समुदाय आहे. ३.५ मिलियन वाचकांच्या संग्रहासह, १२०,००० लघुकथा आणि कविता, आणि १६००० कथालेखक, यासह उंची गाठत आहे.  ज्यामध्ये प्रत्येक लेखक स्वतंत्ररित्या अन्वेषण करू शकतो. आणि त्याची सर्जनशीलता वाढवू शकतो. भारतातील साहित्य अवकाश बदलण्यासाठी स्टोरीमिररकडे एक वेगळा दृष्टीकोन आहे. स्टोरीमिरर लेखक आणि वाचकांमधील फरक दूर करीत लोकांना त्यांची भाषा, वय, पार्श्वभूमी आणि कौशल्य विचारात न घेता प्रोत्साहित करीत आहे. तसेच  स्टोरी मिररने स्टोरीमिअर युवा क्रिएटिव्ह कॉन्क्लेव्ह, नवी मुंबईचे शालेय मुलांसाठीचे पहिले साहित्य महोत्सव इत्यादीसह अनेक शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावरील अनेक स्पर्धांचा भाग बनत आहे. जुलै २०१८ मध्ये, स्टोरी मिररने भारतातील प्रथम इंटर-कॉर्पोरेट कथा आणि कविता लेखन स्पर्धा सुरू केली. १५०० पेक्षा अधिक कॉरपोरेटकडून सहभाग नोंदवला गेला आहे.
 **

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *