डोंबिवली भव्य स्कुल व्हॅन रॅली, वाहतूक नियमांचे पालन करण्याचा दिला संदेश
जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक संस्थेचा तिसरा वर्धापदिन साजरा
डोंबिवली – जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्यावतीने रविवारी सकाळी वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियानानिमित्त भव्य स्कुल व्हॅन रॅली निघाली होती. या रॅलीत 50 स्कूल बस सहभागी झाल्या होत्या. वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश रॅलीतून देण्यात आला.
डोंबिवली पूर्वेतील निवासी विभागातील महावितरण कार्यालयाजवळून या रॅलीला प्रारंभ झाला. घरडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सच्चान यांच्या स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर ही रॅली शेलार चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तर टिळक चौकातील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आलं. ताई पिंगळे चौकातून टिळक रोड-फडके रोड मार्गे इंदिरा चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही रॅली मानपाडा रोडने शिवाजी उद्योग नगरातून पुन्हा एमएसईबी कार्यालयातवजळ रॅलीचा समारोप झाला. या रॅलीला विद्यार्थ्यांसह डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीत डोंबिवलीचे माजी शहरप्रमुख तथा नाशिकचे सह संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण उपशाखेचे पोलिस निरीक्षक गोविंदराव गंभीरे हे सहभागी झाले होते जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव यांनी या रॅलीचे नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजेश जयसवाल, बाळ घरत, कार्याध्यक्ष दिपक वारंग, सचिव वैभव तुपे, खजिनदार लक्ष्मण फडतरे, सहसचिव काशीराम साळवी, सहखजिनदार श्रीकांत चतुर, संघटक राजेंद्र धारवणे, शरद पाटील, सचिन मोरे, तानाजी आहेर, संतोष कदम, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वाहतूक नियमांचे पालन करण्यात यावे असा संदेश असणारे फलक विद्याथ्यांच्या हातात देण्यात आले होते रस्त्यावरची मस्ती म्हणजेच यमराजाशी दोस्ती, घरी कोणी वाट पाहते याची जाणीव ठेवा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका, जलदगतीने गाडया चालवू नये, रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा, तुम्ही चालक आहात, मृत्युचे संचालक नाही, वेगाची नशा करी जीवनाची दुर्दशा, हेल्मेट वापरा जीव वाचवा, पोटात टाकून पावशेर दारू नकाे मरू किंवा मारू अशा विविध संदेश देणारे फलक व्हॅनवर लावण्यात आले होते. जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्यावतीने तिस- या वर्धापनदिनानिमित्त सत्यनारायणाची पुजेचे आयोजन करण्यात आल ंहोतं त्याचा दर्शनाचा वा प्रसादाचा लाभ मान्यवरांनी घेतला तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले या शिबीराचा लाभ अनेकांनी घेतला.