डोंबिवलीत रविवारी भव्य स्कुल व्हॅन रॅली

जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन

डोंबिवली : जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्था यांच्यावतीने रविवारी १४ जानेवारी २०१८ रोजी वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियानानिमित्त भव्य स्कुल हॅन रॅलीचे आयेाजन करण्यात आलय. तसेच संस्थेच्या तिस- या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची पुजेचे आयोजन करयात आलय अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव यांनी दिलीय.
जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्यावतीने गेल्या तीन वर्षापासून ही रॅली काढण्यात येते. डोंबिवली शहरातील विविध भागातून ही रॅली निघते. या रॅलीच्या माध्यमातून वाहतुकीचे नियमांची जनजागृती केली जाते. रॅलीचा समारोप घरडा कॉलनी शिवमंदिराच्या शेजारी एमएसईबी ऑफीसच्या समोर डोंबिवली पूर्व येथे होतो. या ठिकाणी सत्यनारायणाची पुजेचे आयेाजन करण्यता येतं तरी नागरिकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जाधव यांनी केलय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *