मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त केल्यानंतर आज पून्हा राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप (bjp) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. INS विक्रांतसाठी जो निधी जमा करण्यात आला आहे, त्यामध्ये 57 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा देशद्रोह आहे. त्यामुळे सोमय्यांवर याप्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी यावेळी ईडीवर देखील निशाणा साधला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा जर खरच निपक्षपाती असतील तर त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा असे आवाहान राऊत यांनी केले आहे.
किरीट सोमय्या यांच्या नेतृत्त्वाखाली ‘सेव्ह विक्रांत’ या उपक्रमातंर्गत पैसे जमवण्यास सुरुवात झाली. चर्चगेटपासून अंबरनाथपर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर किरीट सोमय्या यांच्या लोकांनी डबे फिरवून पैसे गोळा केले. या माध्यमातून ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. ही रक्कम आपण राजभवनाकडे सुपूर्द करू, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. मात्र, माहिती अधिकारातंर्गत राजभवन कार्यालयाला तशी विचारणा केली तेव्हा आमच्याकडे असे कोणतेही पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे पैसे कोणाच्या घशात आणि खिशात गेले?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचे याची त्यांनी माहिती असल्याचेही राऊत यांनी म्हटले.
INS विक्रांतच्या जतनासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. मात्र हे पैसे राजभवनात पोहोचलेच नाही, या पैशांचे पुढे काय झाले असा सवाल राऊत यांनी केला आहे. या प्रकरणात 57 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विक्रांतशी देशातील नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ते देशाच्या संरक्षण शक्तीचे एक प्रतिक आहे. त्याच्यामध्ये जर घोटाळा होत असेल तर हा देशद्रोह ठरतो. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
आरोप करण्यापेक्षा मुख्यमंत्रयाकडे पुरावे द्या : किरीट सोमय्या
आयएनएस विक्रांतप्रकरणी मी काही घोटाळा केल्याचा संशय असेल, तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप करण्यापेक्षा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुरावे द्यावेत. उगीच या प्रकरणात टाइमपास करून वेळ वाया घालवू नये, असे आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे.