डोंबिवली : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची खासदरकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि रद्द केलेली खासदारकी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसतर्फे रविवारी डोंबिवली पश्चिमेतील गांधी उद्यानात बसून सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आला. यावेळी नागरी विकास सेल प्रदेश अध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी नगरसेवक नवीन सिंग यांनी पदाधिकऱ्यांसह उद्यानात बसून सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले. तसेच रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम हे भजन गाऊन केंद्र सरकरच्या निर्णयाचा जाहीर निषेध नोंदविला.

राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून खासदार होते. पण मानहानीच्या एका खटल्यात सुरत येथील न्यायालयाने त्यांना 2 दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ‘मोदी आडनाव’बाबत केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबाबत हा निर्णय देण्यात दिला होता. न्यायालयाचा निर्णय येताच दुस-या दिवशी राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला. मात्र सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला होता. त्याआधीच लोकसभेतील त्यांचे खासदारकीचे पद रद्द केल्याने काँग्रेस पक्षातर्फे सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

यावेळी डोंबिवली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एकनाथ म्हात्रे , अजय पॉल,पमेश म्हात्रे,लालचंद तिवारी, समशेर खान , बेबी परब ,सुषमा कांबळे , मयूर भगत, प्रकाश चव्हाण ,गौरव माळी, सर्जेराव पडले ,अनिल बनसोडे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सत्याग्रह आंदोलनात सहभागी आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!