साता-यात राजे समर्थकांमध्ये राडेबाजी
सातारा : आणेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्वातून खासदार उदनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे दोन्ही राजे समर्थक एकमेकांशी भिडल्याने मध्यरात्री चांगलाच राडा झाला. यावेळी हवेत गोळीबार आणि वाहनांची तोडफोडही झाली आहे. मधरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला.
आणेवाडी टोलनाका हा गेली बारा वर्षापासून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडे होता. मात्र यावेळी रिलायन्स कंपनीनं हा टोलनाका उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून काढून घेत आणि तो आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांच्या ताब्यात दिला आहे. त्यावरूनच दोन्ही राजे समर्थकांमध्ये राडेबाजी झाली. यावेळी हवेत गोळीबार वाहनांची तोडफोड असे नुकसान झाले. उदयनराजे यांनी आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवेंद्रराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!