मुंबई : इंडिया आघाडीची तिसरी बैठक आज गुरूवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस मुंबईत होत आहे ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत असून या बैठकीसाठी इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांचे नेतेही मुंबईत दाखल होत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदींच्या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी आम्ही देशभक्त इंडियाचे लोक एकत्र आलेलो आहोत. इंडिया को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है, कुणाच्या बापाला आमचा पराभव करणं शक्य नाही, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
इंडिया आघाडीला मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून भाजप आणि त्यांच्यासोबतच्या पक्षांमध्ये घबराट पसरली आहे असा टोला राऊत यांनी लगावला इंडिया आघाडीच्या बैठका वाढत जातील तशी देशात भीतीपोटी का होऊन महागाई कमी होत जाईल २०२४ मध्ये आम्हीच जिंकणार असून इंडिया ला हरवणे अशक्य आहे असे राऊत म्हणाले.
मुंबईत होणा-या बैठकीबाबतही राऊत यांनी माहिती दिली बैठकीची तयारी पूर्ण झाली आहे सायंकाळी बैठकीला सुरूवात होईल आणि ही बैठक उद्यापर्यंत चालेल त्यानंतर आम्ही देशासमोर अॅक्शन प्लॅन घेऊन येऊ असेही ते म्हणाले तसेच आमची ताकद जशी वाढत जाईल ते बघून चीहनी सीमारेषेवरून मागे हटेल असा टोलाही राऊत यांनी लगावला. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी देशभक्तीच्या धाग्यात आम्ही सगळे बांधलो गेलो आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद-मनभेद नाहीयेत. २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाताना आम्ही इंडिया जिंकणारच हा आमचा निर्धार आहे. विरोधक आमचा इंडिया तोडू शकत नाहीत, असं राऊत म्हणाले.