मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या व्हिडिओ वरून राजकीय चर्चांना उधाण आलेले असतानाच या व्हिडिओ वरून या व्हिडीओवरून शिवसेना( ठाकरे) खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर खरमरीत टीका केलीये. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल आणि त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ‘मी पुन्हा येईल’ असं म्हणतानाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ते परत एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार अशा चर्चांना उधाण आलंय. यावर राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय काही काळानंतर आपल्याला मान्य करावा लगेल, असा संदेश एकनाथ शिंदेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून देण्यात आलाय. मी असं जबाबदारीने सांगत असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपने हा व्हिडिओ डिलीट केला असला तरी विरोधकांमध्ये टीका होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!