मुंबई : काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केलेले माजी खासदार संजय निरूपम यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला
लोकसभा निवडणुकीचे तिकिट नाकारल्याने निरूपम पक्षावर नाराज होते तसेच त्यांनी पक्ष विरोधात वक्तव्ये केली होती त्यामुळे पक्षाने मागील महिन्यात त्यांची हाकालपट्टी केली होती दरम्यान आज त्यांनी ठाण्यातील आनंदआश्रम येथे शिंदे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. मात्र पक्ष त्यांना केाणती जबाबदारी देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.