केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाखांची लाच घेताना पकडले

अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी मागितली लाच 

कल्याण  : कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाखांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शनने पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याला पकडण्यात आले आहे. सात मजली अनधिकृत इमारत वाचविण्यासाठी घरत यांनी लाचेची मागणी केली होती. घरत यांच्याबरोबरच लिपीक भूषण पाटील आणि ललित आमरे यांनाही अटक करण्यात आलीय.

अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नये यासाठी संजय घरत यांनी संबंधिताकडे 42 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती 35 लाख रुपये देण्याचे निश्चित ठरले. त्यापैकी पहिला 8 लाखांचा हफ्ता आपल्याच कार्यालयात घेताना ठाणे अँटी करप्शन विभागाने त्यांना पकडले. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान नेहमीच चर्चेत राहणारे आणि वादग्रस्त अधिकारी अशी प्रतिमा असणाऱ्या घरत यांना पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी महापालिकेत तसेच राजकीय वर्तुळात पसरली. घरत हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील जुने अधिकारी समजले जातात. त्यामूळे महापालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये पत्रकार, राजकारणी आणि इतरांची मोठी गर्दी झाली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *