*ठाणे* – हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा अनादी काळापासून चालू आहे. गुरुपौर्णिमेला नेहमीपेक्षा एक हजारपटीने कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ समाजाला घेता यावा, यांसाठी या उद्देशाने *सनातन संस्थेच्या वतीने २१ जुलै २०२४ या दिवशी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम् आदी भाषांमध्ये देशभरात ७५ ठिकाणी तर ठाणे जिल्ह्यात ठाणे, डोंबिवली आणि बदलापूर येथे पार पडला.
या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार; तसेच ‘आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यांसाठी साधना’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन पार पडले. या महोत्सवात धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात आले होते.
*ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’* : देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.