ठाणे : शिक्षणापासून वंचित राहावे असे कोणालाही वाटत नाही, परंतु कधी कधी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येंमुळे शिक्षण सोडावे लागते किंवा दुर व्हावे लागते त्यामुळे समतोल सेवाच्या पुढाकाराने ठाण्यातील १० युवतींना १० स्मार्ट मोबाईल देण्यात आले. एस.हरीहरण यांची मदत आमदार संजय केळकर यांचे मार्गदर्शन आणि विजय जाधव यांचे प्रत्यक्ष कृती यांच्या त्रिवेणी संगमने समतोल सेवा सुरू आहे त्यामुळे मोाबईलमुळे ऑनलाईन शिक्षणात कोणातही खंड पडणार नसल्याने विद्याथ्यांच्या चेह-यावर आनंद पसरला.
ठाणे येथील युवतींना १० स्मार्ट मोबाईल देण्यात आले असले तरीही अजून अनेक मुले आहेत त्यांनाही देण्यात येणार आहे. २४ तास आँनलाईन शिक्षण संस्कार स्टडी मधून उपलब्ध करून दिले आहेत. शिलाई प्रशिक्षण,,कार्यकर्ता प्रशिक्षण हे सुरू आहेच पण शालेय शिक्षण खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे शिक्षणात कोणताही खंड पडता कामा नये शिक्षण थांबता कामा नये म्हणून अशी मदत आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. समतोल फक्त कायदे आणि नियम सांगत नाही तर प्रत्यक्ष कृती तुन आपले काम करीत आहे अशी माहिती समतोल सेवा प्रकल्पाचे प्रमुख विजय जाधव यांनी सांगितले.