सलमान कैदी नंबर १०६ : जोधपूर तुरुंगात रवानगी
मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवल असून त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावलीय. तर दुसरीकडे अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलीय. सलमानची रवानगी जोधपूर तुरुंगात करण्यात आली असून, सलमानला कैदी नंबर १०६ देण्यात आलाय. त्याला तुरुंगाचा ड्रेसहीी देण्यात येणार आहे अशी माहिती जोधपूर तुरुंगाच्या डी आयजी विक्रम सिंह यांनी मीडियाला दिलीय. सलमानची वैदयकीय चाचणी करण्यात आली असून, प्रकृती स्थिर आहे. तर त्याला विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पण सलमान तुरुंगात गेला तर कोट्यवधींचा फटका बॉलीवूड बसणार आहे.