सदाभाऊंचा शासन आपल्या दारी कार्यक्रमांचा सपाटा
ग्रामस्थांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे अधिका- यांना आदेश
मुंबई : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ग्रामीण भागात शासन आपल्या दारी या उपक्रमाची जोरदार सुरूवात केलीय. सोमवारी वाळवा तालुक्यातील केदारवाडी, कासेगाव, शेणे, वाटेगाव भाटवाडी, काळमवाडी व महादेववाडी सुरूल आदी परिसरात नागरिकांच्या समस्या अधिका- यांसमवेतच जाणून घेत तातडीने सोडविण्याचे आदेश दिले. त्यामुळे गावक-यांच्या चेह- यावरही हास्य फुलले.
केदारवाडी ता.वाळवा गटात “शासन आपल्या दारी” उपक्रमास सुरुवात. यावेळी केदारवाडी गावाच्या सरपंच जयमाला धनाजी माने यांनी सदाभाऊंचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव , गटविकास अधिकारी राहुल गावडे, तालुका कृषी अधिकारी भगवान माने, महावितरण कार्यकारी अभियंता कोळी, सर्कल, ग्रामसेवक, तलाठी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. गावातील ग्रामस्थांनी नळ कनेक्शन, लाईट कनेक्शन, वारस नोंदी आदी समस्या मांडल्या. सदाभाऊंनी तात्काळ सोडविण्याचे आदेश अधिका-यांना दिले. गावातील वृद्ध महिला गोकुळा खोत यांनी धान्य मिळत नसल्याची तक्रार केली असता गावातील बाळासो माने, बाजीराव बरगे, उल्हसस कदम यांनी स्वतःच्या रेशनकार्ड वरील धान्य त्यांना दिले. त्याबद्दल त्यांचा भाऊंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष लालासो उल्लास कदम यांनी केले. कासेगाव येथील ग्रामस्थांनी नळ कनेक्शन, लाईट कनेक्शन, वारस नोंदी, पाणंद रस्ते, आदी समस्या मांडल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताजी पाटील, ऍड. संदीप पाटील यांनी केले. शेणे ग्रामस्थांनी नळ कनेक्शन, लाईट कनेक्शन, वारस नोंदी, पाणंद रस्ते आदी समस्या मांडल्या. वाटेगाव आदी ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या. रेशनिंग चे धान्य ज्यांना मिळत नाही त्यांना लवकर धान्य चालू करा असा आदेश सदाभाऊंनी प्रांतांना दिले. लाईट कनेक्शन बंद केल्यानंतरही ज्यांना बिले येतात. त्यांची बिले बंद करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. मीटर रिडींग न घेता अंदाजे बिले दिली जातात या प्रश्नावर भाऊंनी संबंधित अधिकाऱ्यांना एजन्सी रद्द करून त्यांना काळया यादीत टाकण्याचे आदेश दिले. भाटवाडी, काळमवाडी व महादेववाडी सुरूल या गावातील पाणीपुरवठा योजना नेर्ले योजनेपासून स्वतंत्र करा तसेच महादेववाडी पाणीपुरवठा योजनेचं पेठ योजनेतून वेगळी करून स्वतंत्र योजना करा. असे आदेश सदाभाऊंनी दिले. जेणेकरून या गावांना पूर्णवेळ मुबलक पाणी मिळेल. सदर योजनेचे इस्टीमेट करून ८ दिवसांच्या आत या योजनेला पाणी पुरवठा मंत्रयाकरवी मान्यता देण्यात येईल असे निर्देशही दिले. याप्रसंगी रणधीर नाईक, युवानेते सागर खोत, रयत क्रांती शेतमजूर संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासणे, जिल्हाध्यक्ष भास्करनाना कदम तालुकाध्यक्ष लालासो धुमाळे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.
———–