मरळनाथपूर ( संतोष गायकवाड ) : राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी मरळनाथपूर ता वाळवा या त्यांच्या गावी सुरू असलेल्या अखंड हरिनाम पारायण सोहळ्यात सहभागी झाले. मंत्री असल्याचा बडेजाव न करता भाऊंनी हातात टाळ घेत हरिनामाचा गजर केला. वडिलांनी जपलेला भाविक वारसा जपत त्यानीं नाम स्मरण केले.

गेली चार दशके चळवळीत वाढलेल्या या शेतकरी नेत्याला ग्रामीण जीवनाची ओढ आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी प्रश्नावर उपाय योजना राबविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक टीकाना सामोरे जात सदभाऊंचा शेतकऱ्यांविषयची तळमळ सुरूच आहे. डोंगरा एवढया संकटावर मात करण्याची ताकत सामान्य,गोर-गरीब,शेतकरी राजाची आहे. याची जाणीव सदभाऊंचा अंतर्मनात भरलेली आहे. गावकऱ्यांकडूनही त्यांना भरभरून प्रेम मिळत आहे. आपल्या समोर मंत्री आहे याची जाणीव करून न देता आपण सामान्य आहोत ही विचारधारा सदाभाऊनी बाळगली आहे.मंत्री पदातून सामान्य माणसाला ताकत मिळाली पाहिजे यासाठी आजारपणावर मात करत “चाल गड्या चाल भीती कुणाची ना पर्वा कुणाची” या मार्गावर मरळनाथपुरचे सदाभाऊ विकासाचा गजर करत आपल्या सार्वजनिक कामाचा ठसा उमटत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!