सदाभाऊंमुळे ‘ त्या ‘ माऊलीला नवं आयुष्य !
मुंबई : समाजातील गोरगरीब दिनदुबळ्यांच्या मदतीसाठी नेहमीच झटणारे सदाभाऊ म्हणजे सर्वसामान्यांचा आधारच ! सदाभाऊ मंत्रीपदापर्यंत पोहचले असले तरी गोरगरीबांच्या मदतीसाठी ते अजूनही कार्यरत आहेत. आणि त्यांच्या मदतीची आठवणही ते ठेवतात. असाच एक प्रसंग मानखुर्दमध्ये घडला. सदाभाऊंच्या मदतीने एका माऊलीला नवं आयुष्य मिळालं. ती माऊली कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातूनही बरी झालीय. पण हे सदाभाऊंना ठाऊकही नव्हतं. दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी ते मानखुर्दला गेले आणि त्या माऊलीच्या मुलाने सदाभाऊंना ही आठवण करून दिली. आणि घरी येण्याचा हट्ट केला. सदाभाऊ त्यांच्या घरी गेले, आणि त्या माऊलीला मिळालेलं नव आयुष्य पाहून, स्वत:च्या कामाचं समाधान पाहून मन भरून गेलं.
मानखुर्द येथे दहिहंडीच्या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे उपस्थित राहिले होते. त्याचवेळी हा प्रसंग घडला. गावकडच्या लोकांशी संवाद साधताना तेथे राहणारा लक्ष्मण माने हा धावत सदाभाऊंकडे आला. साहेब तुम्ही माझया घरी चला अशी विनवणी तो सदाभाऊंना करू लागला. मात्र पुढील कार्यक्रमासाठी जायचे असल्याने सदाभाऊंनी त्याला नकार दर्शविला. पण तुमच्या मुळेच माझया आईला जीवदान मिळाले. माझी आई कॅन्सरमधून बरी झाली आहे. तिच्या दवाखान्याची व्यवस्था भाऊ तुम्ही केलीत. तुम्ही माझया घरी आलेच पाहिजे असा हट्ट त्यांनी केला. मात्र त्याचा हट्टामुळे अखेर सदाभाऊ त्याच्या घरी गेले. त्या मायलेकांशी सदाभाऊंनी संवाद साधला त्यांची विचारपूस केली. आणि फोटोही काढले. त्या माऊलीला जगण्याची एक आशा पाहून सदाभाऊंना समाधान वाटलं. आणि त्यांचा निरोप घेऊन सदाभाऊ पुढील कार्यक्रमाला रवाना झाले..