डोंजावासियांबरोबर सचिनने लुटला क्रिकेटचा आनंद

उस्मानाबाद – मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडूलकर याने मंगळवारी दत्तक घेतलेल्या डोंजा गावाला भेट दिली. यावेळी सचिनने गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विद्यार्थांसोबत क्रिकेटचा आनंद लुटला. सचिनला गोलंदाजी करताना डोंजेरकरांची बोलिंग करताना चांगलीच तारांबळ उडाली. गावक- यांची खूपच गर्दी जमली होती.
सांसद आदर्श ग्राम योजनेतंर्गत सचिनने उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील डोंजा हे गाव दत्तक घेतलय. मंगळवारी सचिन गावाला भेट देण्यासाठी येणार असल्याने गावकरी खुष झाले होते. त्यांनी सचिनच्या स्वागतासाठी दरात रांगोळया काढल्या होता तर घरावर गुढी उभारली होती. रस्तेही चकाचक करण्यात आले होतं. सचिनचे आगमन होताच गावक-यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सचिनने जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून खेळाइतकेच शिक्षणही महत्वाचे असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांबरोबरच गावक-यांच्या अडचणी जाणून त्यांच्याशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *