भिवंडीतील तत्कालीन तहसीलदारांची माहिती नाकारली : आरटीआय कार्यकत्यांची मुख्यमंत्रयाकडे धाव
भिवंडी – भिवंडीच्या तत्कालीन तहसीलदार वैशाली लंभाते यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता माहितीचा अर्जच निकालात काढण्यात आल्याने आरटीआय कार्यकर्ते नागेश निमकर यानी थेट राज्यपाल , मुख्यमंत्री ,सचिव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. माहिती अर्ज निकालात काढून तत्कालीन तहसीलदारांचा भ्रष्टाचार दडपण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप निमकर यांनी केलाय
3 ऑक्टोबर 2017 रोजी तत्कालीन तहसीलदार वैशाली लंभाते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यासंदर्भात तसेच कशेळी , मोहली गावातील कुळ वहिवाटची माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. मात्र नायब तहसीलदार भाऊसाहेब अंधेरे यांनी माहिती अधिकार अधिनियम कलम 2 चा आधार घेऊन माहिती देण्यास नकार दिल्याचे निमकर यांनी सांगितले. एखादी माहिती न देणे म्हणजे माहिती दडपण्याचाच हा प्रकार असल्याचे निमकर यांचे म्हणणे आहे. मात्र अपिलाबाबतही त्यांनी कोणतीच माहिती दिली नाही. त्यामुळे या प्रकरणाविषयी आणखीनच संशय वाढला असल्याने मुख्यमंत्रयाकडे धाव घेतल्याचे निमकर यांनी सांगितले.