संविधान ही आमची जान – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

*गीता बायबल पेक्षा संविधान आम्हाला प्यारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

*61 व्या वर्धापन दिन सोहळ्यात ठाण्यात रिपब्लिकन पक्षाचे प्रचंड शक्तीप्रदर्शन*

ठाणे  – रिपाइंला झाली पूर्ण 61 वर्ष ; आम्हाला झाला आहे हर्ष
अशी काव्यमय सुरुवात करून कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र  मोदींच्या नेतृत्वात सरकार ची फार मोठी घोडदौड सुरू आहे.त्याला घाबरून दलितांमध्ये संभ्रम पसरविण्यासाठी घटना बदलणार हा काँग्रेसकडून चुकीचा खोडसाळ प्रचार केला जात आहे. मात्र हा काँग्रेस चा खोटा प्रचार आंबेडकरी जनता उधळून लावेल. संविधान ही तर आमची जान आहे. असे सांगत दलितांचे मतदान माझ्यासोबत बहुसंख्य असून आगामी निवडणुकांत काँग्रेसने कितीही थयथयाट केला तरी रिपब्लिकन पक्ष भाजप युती चे सरकार आगामी निवडणुकीत निश्चित विजयी होईल. शिवसेनासोबत असो अथवा नसो भाजप रिपाइं युतीचा विजय निश्चित होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला .

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे कामाचा आराखडा सर्व नेत्यांच्या सहमतीने मंजूर केला आहे. तरी इंदूमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीवरून वाद निर्माण केला जात आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची कर्तृत्वाची उंची पुतळ्याच्या उंचीवरून कृपया मोजू नका. असे आवाहन करून डॉ आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. वेळ पडली तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सणारकासाठी राज्य सरकार गहाण ठेऊ असे सांगत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान ही भारताची ओळख झाले आहे. संविधान आम्हाला गीता बायबल कुराण पेक्षा प्यारे आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले . यावेळी केंद्रात रामदास आठवले यांना कॅबिनेट दर्जा चे मंत्रिपद तसेच राज्यात रिपब्लिकन पक्षाला एक राज्यमंत्रीपद देणार आणि महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्ष राजा सरवदे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याची अधिसूचना तीन दिवसात काढण्यात येईल तसेच भीमकोरेगाव प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र्र बंद मधील आंदोलकांवरील  सर्व गुन्हे रद्द होतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

रिपब्लिकन पक्षाच्या 61 व्या वर्धापन दिन सोहळ्यात उदघाटक म्हणून मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस आणि सभा अध्यक्ष म्हणून केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आंबेडकरी जनतेने ठाण्याच्या हायलँड पार्क मैदानात प्रचंड गर्दी केली होती.यावेळी खासदार कपिल पाटील; आमदार निरंजन डावखरे ; सौ सीमाताई आठवले ; कुमार जित आठवले; अविनाश महातेकर ;भुपेश थुलकर ; राजा सरवदे; बाबुराव कदम ; एम डी शेवाळे; पुण्याचे उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे ;ऍड आशाताई लांडगे; दिपकभाऊ निकाळजे; गौतम सोनवणे; डॉ विजय मोरे; सुरेश बरशिंग; अनिल गांगुर्डे;, सौ शीलाताई गांगुर्डे; दयाळ बहादूरे; पप्पू कागदे; कांतिकुमार जैन; अनिल गोंडाने; स्वागताध्यक्ष राम तायडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

.देश जोडण्याचे काम आपल्याला करायचे आहे .घटनेतील भारत उभा करण्यासाठी जोडण्याची प्रक्रिया सुरू करावे लागेल .
समतेसाठी लढा उभारावा लागेल गांभीर्याने काम करावे लागेल .
सर्व जाती धर्मा वरील वाद मिटवावे लागतील. असे आवाहन ना रामदास आठवलेंनी यावेळी केले. पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये आणल्यास 30 रुपयांनी कमी होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचार करावा. सामान्य माणसाला पेट्रोल डिझेल दरवाढी मुळे त्रास होत आहे ते दर कमी करावेत.अशी सूचना ना रामदास आठवलेंनी केली. मराठा समाजाला जर खरेच आरक्षण द्यायचे असेल तर संसदेत कायदा करावा लागेल. विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी संसदेत सरकार ने ऍट्रोसिटी कायदा संमत केला
अट्रोसिटी कायद्याचा गैरवापर करून आपले दुश्मन वाढवू नका
सतत दलित मराठा वाद नको. महाराष्ट्र्र बंद मध्ये आम्ही होतो मात्र दलित मराठा वाद झाला नाही.भीमाकोरेगाव आंदोलनातील गुन्हे रद्द करण्याचे जाहीर केले होते . मात्र अद्याप रद्द झाले नाहीत ते सर्व गुन्हे त्वरीत रद्द करावेत अशी मागणी आज पुन्हा ना रामदास आठवलेंनी आपली भाषणात केली.महात्मा फुले महामंडळाला राज्यमंत्री दर्जा दिला पाहीजे. मला केंद्रात कॅबिनेट दर्जा मिळाला पाहिजे.भाजप सोबत शिवसेना राहो अथवा न राहो आम्ही राहणार आहोत. असे ना रामदास आठवले म्हणाले .

औरंगाबाद मध्ये दोन पक्ष आणि अनेक संघटनांची मिळून सभा झाली. मात्र ठाण्यात आज माझ्या एकट्या पक्षाची सभा आहे. प्रचंड संख्येने लोक उपस्थित आहेत ही काय माणसे नाहीत काय? 2019 मध्ये करायचं काय ? मोदी फडणवीस यांना साथ द्यायची आहे. काँग्रेस ने जे 60 वर्षांत केले नाही ते मोदिंच्या नेतृत्वात भाजपने केले असून लंडन चे घर ते इंदूमिल पर्यंत च्या स्मारकांचा प्रश्न मोदी आणि फडणवीस यांनी सोडविला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत भाजप ला रिपाइं चि साथ असणार आहे असे ना रामदास आठवलेंनी जाहीर केले. इंदूमिल मधील स्मारकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट पुतळा उभा राहणार आहे. त्यात चबुतरा 90 फूट आणि पुतळा 260 फूट त्या उंचीवरून वाद करू नका .असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. काँग्रेस ने कितीही थयथयाट केला तरी भाजप रिपाइं युती जिंकणार आहे. 2000 सलापर्यंत भूमिहीनांचे अतिक्रमण नियमित करावे. मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करावे.अशी मागणी करून 2011 पर्यंत चे झोपडया कायदेशीर करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. दलितांचे सर्व मतदान प्रकाश आंबेडकरांसोबत आहे असा कोणी गैरसमज करू नये .माझ्यासोबत सुद्धा दलितांचे बहुसंख्य मतदान आहे. लोकसभेला आमच्या पक्षाला 2 जागा द्याव्यात त्या निवडून आल्यास पक्षाला मान्यता मिळेल तसेच सत्ता नाही तरी माझे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत असे ना रामदास आठवले म्हणाले.

“विषमतेवर घालणार आहोत घाव
काँग्रेस चा उलटविणार आहोत डाव
मला नाही हाव म्हणून मी आहे तुमचा भाव
रिपाइं आहे माझं गाव कारण रामदास आठवले आहे या पठयाचं नाव ”

भाजप आरपीआयचा आहे साथी
सत्ता येईल आमच्या हाती
सर्वांशी जोडणार आम्ही नाती

भाजप ने साडेचार वर्षांत खूप चांगली कामगिरी केली त्यामुळे जे काम चांगले त्याचे स्वागत केले पाहिजे .आरक्षण संविधान याच आम्ही संरक्षण करणार . त्यासाठीच मी सरकार मध्ये आहे. न्यायालयाने पदोन्नती बद्दल चांगली भूमिका घेतली मात्र त्यासाठी राज्यात आणि केंद्रात कायदा करणे गरजेचे आहे असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचे काँग्रेसवर टीका करणारे जोशपूर्ण भाषण झाले. ते म्हणाले वंचितांना न्याय देण्यासाठी आठवलेंच्या नेतृत्वात हा पक्ष कार्यरत रहावा. रामदास आठवले हे जनसामन्यातून संघर्षातून तयार झालेले नेते आहेत. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाला सर्व भारतात स्थापन केले आहे. ईशान्य भारतात त्यांनी रिपाइं ची स्थापना केली आहे.डॉ बाबासाहेबांना अभिप्रेत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष साकार करण्याचे श्रेय रामदास आठवलेंचे आहे. रामदास आठवले जातात जिथे सत्ता येते तिथे* असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. भाजप रिपाइं युती अभेद्य राहील वंचितांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आठवलेंच्या नेतृत्वात सरकार सामाजिक न्यायांच्या विचाराने काम करीत राहील. 1975 मध्ये आणीबाणी आणून मूलभूत अधिकार काढून संविधानाला हानी पोहोचविण्याचे काम इंदिरा गांधींनी केले. या संविधानामुळे भारताची जगात ओळख आहे. गीता कुराण बायबल पेक्षा संविधान प्यारे. संविधानामुळेच आमची सन्मान आहे. संविधान कोणी बदलू शकत नाही. संसदेला ही संविधान बदलण्याचा अधिकार नाही. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देशात फक्त 3 वेळा बदलला इंदिरा गांधी यांनी त्यांच्या काळात त्यांच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला. ऍट्रोसिटी कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मोदींनी बदलला.या निर्णयात रामदास आठवले यांच्या मंत्रालयाचा महत्वाचा भाग होता. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या मेळाव्यास राज्यातून रिपब्लिकन पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. रिपाइं चे राज्य उपाध्यक्ष फारुखभाई दळवी; जगदीश गायकवाड ; भगवान भालेराव ; प्रल्हाद जाधव; सिद्राम ओव्हाळ; अंकुश गायकवाड;महेंद्र शिर्के; बाळाराम गायकवाड ;हेमंत सावंत; चंद्रकांता सोनकांबळे; सूर्यकांत वाघमारे; ऍड अभयाताई सोनवणे; संगीता आठवले; बाळाराम गायकवाड; रमेश मकासरे; उत्तम कांबळे बाळासाहेब गरुड; विनोद चांदमारे;प्रभाकर पोखरीकर; रमेश गायकवाड ; चंद्रशेखर कांबळे; सचिनभाई मोहिते;, विजय साबळे; घनश्याम चिरणकर; हेमंत रणपिसे;, अविनाश मडीखांबे ;,सोना कांबळे; राहुल रुही;, अरुण पाठारे;असित गांगुर्डे;नागराज गायकवाड आरिफ तांबोळी ; मनोज रणपिसे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

——–+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!