लोणावळयात बेरोजगारांना उद्योग, व्यवसायाचे मार्गदर्शन
लोणावळा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पुणे जिल्हा आणि रामदास आठवले औद्योगिक /उत्पादक बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादीत यांच्यावतीने मंगळवारी लोणवळा येथे बेरोजगारांसाठी राज्यस्तरीय रोजगार, उद्योग, व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयेाजन करण्यात आले होते. या मेळाव्यात डोंबिवलीचे उद्योजक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड हे उपस्थित होते. रिपाइंचे पुणे जिल्हा अध्यक्ष व आयोजक सुर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते अंकुश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रिपाइंचे पदाधिकारी किशोर मगरे, वसंत टेकाळे, समाधान तायडे, मोहना शहर युवक आघाडी अध्यक्ष दिनेश जाधव, तुकाराम पवार, दिलीप काकडे आदी उपस्थित होते.
रिपाइंचे पुणे जिल्हा अध्यक्ष व आयोजक सुर्यकांत वाघमारे यांनी या मेळाव्याचे आयेाजन केले होते. तरूणांनी स्वत:चा उद्योग, व्यवसाय कसा सुरू करावा त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करावे याचे मार्गदर्शन शिबीरात देण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या योजनेची माहितीही तरूणांना देण्यात आली. उद्योग, व्यवसायासाठी ५० हजारापासून ते १५ केाटीपर्यंत कर्ज कशाप्रकारे उपलब्ध केले जाईल याची माहिती देण्यात आली. या मेळाव्यासाठी राज्यभरातून तरूण मोठया संख्येने उपस्थित होते. तरुणांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी जे सहकार्य लागेल ते देण्यात येईल असे वाघमारे यांनी सांगितले.