डोंबिवली ; 74व्या स्वातंत्र दिवसाचे औचित्य साधून, लॉक डाऊन काळात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या करोना योद्ध्यांचा रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या रोटरॅक्ट क्लब ऑफ यूथ रॉयल कॉलेज, डोंबिवली, यांच्या वतीने संयुक्तपणे ऑनलाईन पद्धतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात रोटेरीयन डाॅ श्रुती जोशींनी देशभक्तीपर गीत गाऊन केली.
याप्रसंगी योगेश मेहता, डॉ रोहित गायकवाड, मुकेश पाटील, समीक्षा बहादरे, राजेंद्र देशमुख, उर्वशी प्रजापती, रोहित फडणीस, रोनक संगोई, सचिन जाधव, किरण देसाई आणि सुबोध पटवर्धन यांचा सत्कार, मुख्य अतिथी, रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 चे नियोजित प्रांतपाल डॉ मयुरेश वारके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट 3142चे उप प्रांतपाल सुब्रमण्यन कृष्णमुर्ती आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष अॅड.कैलाश सोनवणे, सेक्रेटरी अजय कुलकर्णी, रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष आशुतोष आर्य व सेक्रेटरी अनुपम प्रसाद, हे उपस्थित होते.
प्रकल्प प्रमुख डॉ मंदार पवार यांनी या प्रसंगी, समाजातील विविध क्षेत्रात, कोरोना काळातही लोकांसाठी सेवा करून कार्यरत राहीले अशा सर्व करोना योद्ध्यांचे कौतुक केले व ते निस्वार्थपणे हे काम करत आहेत असे सांगितले.कुठेतरी त्यांचीही दखल घेतली गेली पाहिजे व कौतुक होऊन गौरव केला पाहिजे मत मांडले आणि हा सोहळा त्यांच्या साठीच असल्याचे जाहीर केले.डॉ लीना लोकरस यांनी हा सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दल रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. या समारंभाचे समन्वयक डॉ मनोहर अकोले होते. डॉ मयुरेश वारके यांनी त्यांच्या भाषणात, समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या करोना योद्ध्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या या कार्यामुळे समाजातील भिती जाऊन स्थिरता राखण्यात मदत झाली असे सांगितले. या प्रसंगी रोटरी व रोट्रॅक्ट क्लबचे मान्यवर सभासद व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****