कल्याण : येथील जे बी मेन्स कलेक्शन नामक कपडयाच्या दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरटयांनी दुकानातील तब्बल देान लाखांचा माल लंपास केल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पेालीस ठाण्यात नेांद करण्यात आली आहे. शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसलय.
कल्याणजवळील म्हारळ गावात राहणारे भूपेश नामदेव जाधव यांच्या मालकीचे जे बी मेन्स कलेक्शन हे दुकान आहे. बिर्ला गेट सेंच्युरी हॉस्पीटल जवळील रेमंड शोरूम शेजारी कल्याण पश्चिम येथे हे दुकान आहे. १६ नोव्हेंबर रेाजी भूपेश हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर तोडलेल्या अवस्थेत दिसले. दुकानातील लाखो रूपयांचे कपडेही चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला.
भूपेश जाधव हे साधे आणि गरीब होतकरू स्वभावाचे तरुण आहेत. छोटा उद्योजक म्हणून उपजीविका करण्यासाठी ते कपडयाचे दुकान चालवित होते मराठी माणूस नोकऱ्या मिळत नाही. म्हणून उद्योग क्षेत्राकडे वळत आहे त्यातच अशा घटना घडल्यानंतर होतकरू गरीब उद्योजकांचे अवसान गळून पडत आहेत. कष्ट, कर्ज, संघर्षातून त्यांनी आपला व्यवसाय उभा केला होता. चोरटयांनी दुकानातील लाखो रूपयांचा माल चोरून नेल्याने डोक्यावरील कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेत भूपेश आणि निलेश हे बंधू आहेत.
शहरात चोरी घरफोडी आणि सोनसाखळी चोरांचे प्रमाण खूपच वाढले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी जागरूक नागरिक करीत आहेत.