आधी पुर्नवसन करा, मग घर तोडा
शिंदे दांम्पत्याचा केडीएमसीला आत्महत्येचा इशारा
डोंबिवली: पश्चिमेतील ह प्रभाग क्षेत्रातील गणेशनगर परिसरात राहणारे यशवंत शिंदे यांचे घर रस्ता रुंदीकरणात बाधित होत असल्याने त्यांनी त्यास विरोध दर्शविला आहे. आधी पुर्नवसन मग घर तोडा,अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा शिंदे दांम्पत्यांनी महापालिका आयुक्त पी वेलारासु यांना एका निवेदनाद्वारे दिलाय.
पश्चिमकडील राजुनगर (गणेशनगर) परिसरात यशवंत रामाजीराव शिंदे यांची ४ रूम आणि ३ छोटे गाळे अशी मिळकत आहे त्यावर शिंदे दांम्पत्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. गेल्या 40 वर्षां पासून ते याठिकाणी राहतात. मात्र शहरात रास्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरु आहे. त्यात शिंदे यांचे घर आणि गाळे जमिनदोस्त होत आहेत. रस्ता रूंदीकरणाची नोटीस महापालिकेने दिली आहे. गेली चाळीस वर्षे मी या वास्तूत राहत असून मला दुसरा केाणताच आधार नाही. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्रयानाही सांकड घातलय. मात्र त्यांना कोणाकडूनही काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. माझे राहते घर तोडण्यापूर्वी पालिका प्रशासनाने पुनर्वसन करावे नंतरच तोडण्याचा विचार करावा. जर याबात योग्य ती दाखल घेण्यात आली नाही तर मला नाईलाजाने जीवन संपवावे लागेल असे यशवंत शिंदे यांनी देलेल्या पत्रात उल्लेखले आहे. शिंदे यांच्या या पवित्र्यामुळे आता पालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.