४२ टक्के महिला मुख्य प्रवाहात येतील, तेव्हाच भारत महासत्ता होईल :- संविता पावसकर
शहापूर : जो पर्यंत भारतातील बेचालीस टक्के महिला मुख्य प्रवाहात येतील तेव्हाच भारत देश महासत्ता होईल असे प्रतिपादन बँक आँफ महाराष्टाच्या वित्त व ऋण सल्लागार सविता पावसकर यांनी केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए ) वासिंद विभाग व शहराच्या वतीने सावित्रीमाता फुले स्मुतीदिनी जागतिक महिला दिन साजरा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. स्त्रीभ्रुण हत्या, व्यसनमुक्ती, हुंड्यावर चौफेर टोलेबाजी करून महीलांना सशक्त बनण्याचे आवाहन त्यानी महिलांना केले. महिला राष्ट्रीय अध्यक्ष सिमाताई आठवले व राष्ट्रीय सचिव शिलाताई गांगुर्डे यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी अन्याय ,अत्याचार विरोधात लढा , स्त्री मुक्ती चळवळ व महिलांचे आरक्षण यावर पथनाट्य निर्मिती प्रमुख केदारे व त्यांच्या टीमने सादर केले. लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धा पार पडल्या. बचत गटांच्या महिला अध्यक्षांचा सन्मान व नवनिर्वाचित पंचायत समिति सदस्य ,ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला खास करून प्रमुख पाहुणे महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पद्मा इंगळे , भिंवडी ता.अध्यक्ष संगीता गायकवाड , कल्याण ग्रा.अध्यक्ष वनिता मोरे , टी.डी.सी.बँक अधिकारी शारदा सानप , पंचायत शहापूर उपसभापती वनिता भेरे , पंचायत समिति सदस्य संजीवनी कोचूरे , ग्रामपंचायत सदस्य प्रेरणा गायकवाड , संजना पाटील ,ज्योती भालेराव आदी मान्यवरांच्या उपस्थीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष अनिल गांगुर्डे , प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड , जिल्हा उपाध्यक्ष विनोद थोरात ,जिल्हा सह सचिव आत्माराम पगारे , ता.अध्यक्ष जयवंत थोरात ,बबन गायकवाड ,युवा ता.अध्यक्ष विकास निकम , वि.अध्यक्ष नरेंद्र कोचूरे ,वि.सहसचिव राहुल दिवेकर ,शहर अध्यक्ष प्रविण गायकवाड ,युवा अध्यक्ष राहुल दोंदे , युवानेते नीतेश सोष्टे , कल्याण / कसारा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजेश घनघाव , राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संदिप पाटील , पत्रकार मंगेश पाटील , संजय भालेराव आदी मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आघाडीच्या प्रतिभा कांबळे , पगारे मँडम , वीणा जगताप , अमृता सोनावणे ,मिनल जाधव , सुजाता दिवेकर , शिंदे ताई ,सोष्टे ताई यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले.