कल्याणनंतर आता डोंबिवलीत रिक्षाचालकाची दादागिरी
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याणातील रिक्षाचालकाने एका प्रवाश्यांला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. कल्याणप्रमाणेच डोंबिवलीतही रिक्षा चालकाच्या दादागिरीचा प्रकार समोर आलाय. एका रिक्षाचालकाने मोटरसायकल चालकाला दमदाटी करीत, रिक्षा अंगावर नेण्याचा प्रयत्न केलाय. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
डोंबिवलीत राहणारे महेश काळे हे मोटरसायकलवरून दुपारी साडेबाराच्या सुमारास पश्चिमेकडील स्टेशनजवळील गोमांतक बेकरीजवळील रत्याने वळण घेत होते. त्यावेळी गुप्ते रोडवरून एमएच०५ –बीजी ३६३४ या क्रमाकांच्या रिक्षावरील रिक्षाचालकाने त्यांच्या मोटरसायकल समोर रिक्षा आणली. काळे यांनी रिक्षाचालकाला त्याची चूक सांगितली असता रिक्षाचालकाने त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. काळे यांनी सुरुवातीला त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या मुजोर रिक्षाचालकाने उलट दमदाटी करीत, तूला कुठे तक्रार करायची असेल तिकडे कर अशी मुजोरीची भाषा केली. काळे यांनी रिक्षाचालकाविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केलीय. त्यानंतर काळे यांनी वाहतूक नियंत्रण शाखेत रिक्षाचालकाची तक्रार करत रिक्षाचालकाने नियमानुसार गणवेश परिधान केला नव्हता, त्याच्याकडे लायसन्स नव्हते अशी माहिती पोलिसांना दिली. कल्याण डोंबिवलीत रिक्षा चालकाच्या दादागिरीचा वारंवार अनुभव प्रवाशांना सहन करावा लागत आहे. कधी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, मीटर प्रमाणे प्रवासी भाडे नाकारले ् प्रवाशांशी हुज्जत घालणे असे अनेक प्रकार सर्रासपणे सुरू असतात. मात्र प्रवासी मुकाटयाने हे सहन करीत आहे. वाहतूक पेालीस आणि स्थानिक पोलिसांचे रिक्षा चालकांवर नियंत्रण नसल्याने त्यांचा उमर्टपणा अधिकच वाढला आहे त्यामुळे अशा रिक्षा चालकांवर कारवाई करावी अशी मागणी हेात आहे.
मी काल बाजीप्रभू चौकात होतो पनवेल ला जाणाऱ्या बसेस उभ्या राहतात तेथे रिक्षा टॅक्सी डबल पार्किंग करून उभ्या रहातात लोकांना चालायला मिळत नाही त्याना विचारले तर दादागिरी वार्ता करतात
वाहतूक पोलीस हो तुम्हाला नम्र विनंती कारवाई करण्यात हयगय करू नका