पुणे : पुणे मेट्रोची सेवा पहिल्या टप्प्यातील मार्गिका 1-पिंपरीद्वारे चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि मार्गिका 2द्वारे वनाझ ते रुबी हॉल अशा एकूण 24 किलोमीटर मार्गावर प्रवासी सेवा सुरू आहे. उर्वरित 9 किलोमीटर मार्गाचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. सुरू असलेल्या मार्गावर प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून परतीच्या तिकिटाची सुविधाही महामेट्रोने उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता महामेट्रो प्रशासनाने परतीच्या तिकिटाची सुविधा 1 मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जाताना आणि येताना असे दोन वेळा तिकीट काढावे लागणार आहे. यामुळे प्रवासांचा वेळ खर्च होणार आहे.
याआधी महामेट्रोने प्रवाशांसाठी तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर 20 मिनिटांत प्रवास सुरू करणे बंधनकारक केले होते.अनेक जण तिकीट काढून मेट्रो स्थानकात गेल्यानंतर आतमध्ये निवांत बसतात. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची विनाकारण गैरसोय होते. यावर उपाय म्हणून महामेट्रोने प्रवाशांसाठी तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर 20 मिनिटांत प्रवास सुरू करणे बंधनकारक करण्याचे पाऊल उचलले. तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर प्रवास संपवून प्रवाशाने 90 मिनिटांत बाहेर पडणे बंधनकारक केले आहे.
पुणे मेट्रोत आता परतीचे (रिटर्न) तिकीट १ मार्चपासून बंद होणार आहे. महामेट्रोने याबाबतचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांना आता जाताना आणि येताना वेगवेगळे तिकीट काढावे लागणार आहे. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.