कल्याण : कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचरा वेचक मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या अनुबंध संस्थेतर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवाळी स्टॉल लावण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाच्या सहकार्याने लावण्यात आलेल्या या स्टॉलवर कचरावेचक मुलांनी बनवलेली उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.


डंपिंग ग्राऊंडवरील कचरा वेचक मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून अनुबंध संस्थेतर्फे काम केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाच्या सहकार्याने हा दिवाळी स्टॉल उपक्रम राबवण्यात आला. ज्यामध्ये पणत्या, उटणे आणि फ्रूट सोप ही उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. याला बीव्हीजी फॅसिलिटी टीमने अतिशय चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये अनुबंध संस्थेच्या सूर्यकांत कोळी, विशाल कुंटे, प्रभाकर घुले आणि शिला घुले हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!