डोंबिवली : देशात आणि राज्यात घडलेल्या विविध घटनांच्या निषेधार्थ आज डोंबिवलीत रिपब्लिकन सेना व रिपब्लिकन युवा सेनेने रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन केले. तसेच महापुरूषांविषयी बेताल वक्तव्य करणा-या संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी करीत त्यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं आले.

मणिपूर येथील दोन महिलांची नग्न धिंड प्रकरण, अकोला येथील १९ वर्षीय निर्घृण हत्या प्रकरण, जळगावातील भडगाव तालुक्यातील असलेल्या गोंडगाव येथील मराठा समाजाच्या अल्पवयीन मुलीचे बलात्कार प्रकरण, महिलांचे संरक्षण, महाराष्ट्रावरील वाढते हल्ले आणि महापुरूषांविषयी बेताल वक्तव्य करणारे संभाजी भिडे अशा विविध प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी रिपब्लिकन सेनेने आंदोलन केले. यावेळी आंदोलनकत्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनप्रसंगी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रामनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारळे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.

याप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे (पँथर)आनंद नवसागरे, राहुल नवसागरे(डोंबिवली विधानसभा अध्यक्ष), सुरेखा जाधव(महीला आघाडी), अर्जुन जाधव (शहर उपाध्यक्ष), नितीन साबळे (शहर संघटक), सुभाष शिरसाट(कल्याण डोंबिवली युवा अध्यक्ष), अरुण शिरसाट (डोंबिवली शहर युवा अध्यक्ष), संदीप हेलोडे(डोंबिवली शहर युवा संघटक), तूषार बनसोडे(महासचिव), ज्ञानेश्वर खडसे(क. डों.शहर संघटक), समाधान वानखडे(जिल्हा कार्य.सदस्य),गायक मछिंद्र सुतार,दिपक दाभाडे,प्रवीण हनवते,विजय पंडित,विजय मोरे,शरद पंडित, सचिन खरात सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.सदर आंदोलनाचे नियोजन संदीप हेलोडे(युवा संघटक)यांनी केले होते.सदर आंदोलनास आझाद समाज पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दामोदर काकडे,शहर अध्यक्ष राहुल मेहता,जयेश मोहिते,वंचित बहुजन आघाडीचे दिपक भालेराव यांनी सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!