घाटकोपरची रिमा चौधरी सुवर्ण पदकाची मानकरी

घाटकोपर ( निलेश मोरे ) महाराष्ट्र डायरेक्टरेट मुंबई अ गट महाराष्ट्र गर्ल बटालियन युनिट श्रीमती पी एन दोषी महाविद्यालयाची राष्ट्रीय छात्र सेवा विभागाची बी.ए भाग 1 ची विद्यार्थिनी रिमा चौधरी हिची दिल्ली येथे होणाऱ्या थल सैनिक केम्पसाठी निवड झाली . या स्पर्धेसाठी राज्यस्तरातून सात गटातून मधून 80 केडेट्सची निवड झाली . मुंबई अ गट मधून 11 केडेट्सची निवड झाली त्यापैकी घाटकोपरच्या श्रीमती पी एन दोषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिमा चौधरी हिची निवड झाली . दिल्ली येथे झालेल्या थल सैनिक केम्प मध्ये 17 डायरेक्टरेट मधील 136 केडेट्स पैकी रायफल शूटिंग मध्ये भाग घेणारी रिमा चौधरी हिने सुवर्ण पदक मिळवले . रिमा चौधरीला मिळालेल्या यशामुळे पी एन दोषी महाविद्यालयातुन रिमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *