नवी दिल्ली, 05 डिसेंबर : जगातील सर्वात उंच आणि थंड युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये गीतिका कौलच्या रूपाने पहिल्यांदाच भारतीय लष्कराच्या महिला डॉक्टरला नियुक्त करण्यात आलेय. लेह येथील भारतीय सैन्याच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने ट्विटरवर (एक्स) ही माहिती दिली आहे.
ट्विटरवर काही छायाचित्रे शेअर करताना फायर अँड फ्युरी कॉर्प्सने पोस्टमध्ये लिहिले आहे की, सियाचीन बॅटल स्कूलमध्ये यशस्वीरित्या इंडक्शन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या कॅप्टन गीतिका कौल यांना सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेय. त्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. डॉ. गितीकांच्या नियुक्तीपूर्वी जानेवारी महिन्यात कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्समधील महिला अधिकारी असलेल्या कॅप्टन शिवा चौहान यांना तैनात करण्यात आले होते. सियाचीनमध्ये तापमान मायनस 60 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असते त्यामुळे इथल्या सैनिकांचा कार्यकाळ 3 महिन्यांचा असतो.