संवादातून प्रश्न सुटला नाही, तरच आंदोलनाचे हत्यार उपसा : सदाभाऊ खोत यांचे पदाधिका-यांना मार्गदर्शन
रयत क्रांती संघटनेची पहिली बैठक औरंगाबदमध्ये संपन्न
औरंगाबाद : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेची पहिली कार्यकारिणी बैठक आज औरंगाबाद येथे सदाभाऊंच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, विविध शिबीरे, विविध विषयासंबधीचे मेळावे, कार्यकर्त्यांची जबाबदारी इ. अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना सदाभाऊ म्हणाले की, आपण कोणतेही आंदोलन करताना तो विषय संपुर्ण समजावून घ्यावा. त्यानंतर संबधितांशी संवाद साधावा आणि त्यातूनही तो प्रश्न सुटला नाही तरच आंदोलनाचे हत्यार हातात घ्यावे असे त्यांनी पदाधिकारी व कार्यकत्यांना सांगितलं.
स्वाभिमानचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात बिनसल्यानंतर शेतकरी संघटनेत देान गट पडले होते. अखेर स्वाभिमानमधून बाहेर पडत सदाभाऊंनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केलीय. राज्यभर दौरा करून सदाभाऊंनी या संघटनेची चांगलीच मोर्चेबांधणी केलीय. संघटनेची जिल्हा व तालुका स्तरीय कमिटी नेमणुका करण्यात आल्या आहेत. सदाभाऊंच्या कुशल नेतृत्वामुळे संघटनेत कार्यकत्यांची गर्दी वाढू लागलीय. पहिल्या कार्यकारिणी बैठकीत पदाधिकारी व कार्यकत्यांना त्यांनी सरकारच्या शेतकर्यांसाठीच्या योजना संघटनेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यत कशा पोहचवता येतील या उद्देशाने काम करावे अशाही सुचना दिल्या.या बैठकीस संघटनेचे व युवाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभागिय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, राज्य प्रवक्ते तसेच महाराष्ट्रातील इतर कार्यकर्ते उपस्थित होत.