नारायण राणेंचे लवकरच अच्छे दिन : रविंद्र चव्हाण

डोंबिवली : देशात आणि परदेशात कोकणा संदर्भात विषय निघाला की सर्वप्रथम आदरणीय नारायण राणे यांचेच नाव घेतले जाते. त्यांनी संपूर्ण आयुष्य कोकणच्या विकासासाठी खर्च केले आहे. ते लवकरच मंत्रिमंडळात येतील. देशाचे अच्छे दिन येत आहेत, राणे साहेबांचे देखील अच्छे दिन लवकरच येणार हे निश्चित आहे असे सुतोवाच रत्नागिरी व सिंधुदूर्गचे संपर्कमंत्री व बंदरे, मत्स्य विकास, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्नपुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित वार्तालापाच्या कार्यक्रमात केले.

राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून जनतेसाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. आपल्या खात्याविषयी बोलताना ते म्हणाले की, मेडीकल अॅडमिशनची प्रक्रिया किचकट होती. ही प्रक्रिया बंद होणे गरजेचे होते. देशात भाजपच सरकार आल्यानंतर ही प्रक्रिया बंद करण्यात आली. नीटच्या माध्यमातून मेरीटवर अॅडमिशन देण्यात आल. यातून हुशार विद्याथ्र्यांना न्याय देण्याचं काम कंल गेल. हृदय विकार झाल्यानंतर शल्यचिकित्सासाठी लागणाऱ्या “स्टेन्ट”ची किमत अत्यंत माफक करण्याचे काम या सरकारने केल्याचे त्यांनी सांगितलं. ग्रामीण विभागात काही वेळा डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णसेवा कोलमडून पडते. त्यावर उपाय म्हणून टेलीमेडिसिन माध्यमातून रुग्णांवर इलाज केला जाईल. ज्या शाळामध्ये शिक्षकांचा अभाव आहे अशा शाळेत संगणकाद्वारे विद्यार्थ्याना शिक्षण दिले जाईल. राज्यातील रेशनीग दुकानात पॉज मशीन बसविल्यामुळे वितरण व्यवस्थेत सुधारणा होऊन भ्रष्ट्राचाराला आळा बसलाय असे अनेक निर्णय सरकारने घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितलं. तसेच राज्यातील राष्ट्रीय महामार्ग ५ हजार कि.मी. होता, आता तो 20 हजार कि.मी. पर्यंत पोहचलाय. मुंबई-गोवा या महामार्गावर सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्च होत आहे आणि हे सर्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुशल नेतृत्वामुळे होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितलं. डोंबिवलीत ग्रोथ सेंटर उभारणी होत असून, त्यामुळे रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. डोंबिवलीतील मोठागाव-माणकोली उड्डाणपूल, रिंगरोड, जोशी हायस्कूल उड्डाणपूल, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, रस्ते कॉंक्रीटीकरण आदी कामे भाजपा सरकारच्या काळात होत आहेत शासन काळात होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितलं. तसेच पायाभूत सुविधा, प्रारूप विकास आराखडा मिळणार असल्याने, सुंदर शहर निर्मित होणार आहे. पण या निर्मितीमध्ये विरोधक खो घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थेत उच्च पदावर असताना शासनाकडून 2650 कोटी निधी आणण्याचे काम त्यावेळी केले होते. त्यातूनच ही विकास कामे सुरू असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

जलवाहतूकीला प्राधान्य, महागाई नियंत्रणात

राज्याला ७२० किमीचा समुद्र किनारा लाभलाय. त्यामुळे जलवाहतूकीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. बंदराचा विकासाला प्राधान्य दिलं जात आहे. बंदरांचा विकास केला जात आहे. बंदरात २ लाख मेट्रीक टन पेक्षा जास्त क्षमतेची जहाज यायला सुरूवात झालीय. मालवाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी जलवाहतूक हा एकमेव मार्ग आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीपेक्षा जलवाहतूक सोयीस्कर आणि स्वस्त असणारा मार्ग आहे त्यामुळे महागाई नियंत्रणात येणार आहे असेही चव्हाण यांनी सांगितलं. २०१८ च्या अगोदर जल आणि मालवाहतुकीला सुरूवात होईल असेही त्यांनी सांगितलं.

२९ हजार गावं इंटरनेटने जोडणार

भारत नेट माध्यमातून आमुलाग्र बदल होत आहे. देशात महाराष्ट्राचा नंबर पहिला. राज्यातील २९ हजार गाव भारत नेटने जोडली जाणार आहेत. १४ हजार गाव भारत नेटने जाडली गेली आहेत. उर्वरित गाव २०१८ अगोदर जोडली जातील. आरोग्य, शाळा, ग्रामपचायत व तह्सील कार्यालये या सर्व व्यवस्था इंटरनेटच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. देशात डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून क्रांती होणार आहे. सर्व गावे इंटरनेटच्या माध्यमातून जोडली गेल्यानंतर २४३ व्यवस्था मोबाईलवरून प्राप्त होतील. कोणत्याही दाखल्यासाठी कुठेही जायची गरज भासणार नाही अशी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कामाविषयी चव्हाण यांनी सांगितलं.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *