मुंबई : रायगड – ठाणे- नवी मुंबई वारकरी संप्रदाय यांच्यावतीने दि ४ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान सेंटर पार्क मैदान, खारघर नवी मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन व अखंड हरिनाम सप्ताहाची जोरदार तयारी सुरू आहे. या महाधिवेशनाच्या प्रचार प्रसारासाठी आज पनवेल येथील अजीवली गावात येथे बैठक पार पडली. १८ गावातील श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
अजीवली गावातील शाळेत ही बैठक पार पडली. या बैठकीत या महाअधिवेशनाचे आयोजन समितीचे प्रमुख ह.भ.प. धनाजी महाराज, ह.भ.प. पुंडलिक महाराज, ह.भ.प. मोहन म्हात्रे, ह.भ.प. संतोष केणे, ह.भ.प. अजय पाटील, ह.भ.प. गोरख महाराज घाडगे, ह.भ.प. अरूण वायले, ह.भ.प. हरेश डायरे, ह.भ.प. जेजेराम वायले, ह.भ.प. धाऊशेठ, ह.भ.प. बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
नऊ दिवस चालणा-या महाअधिवेशनाची माहिती आणि कार्यक्रमाची रूपरेषा या बैठकीत ठरविण्यात आली. महाअधिवेशनात संतवीर श्रीगुरू हभप बंडातात्या महाराज कराडकर यांच्या उपस्थितीत आणि श्रीमद भागवत कथा प्रवक्ते श्री गुरू हभप चंद्रशेख महाराज देगलूरकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमदभागवत कथा, महापुराण कथामृतांचे रसपान होणार आहे.
दररोज एक लाख भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असून, अधिवेशनात ५००० टाळकरी, ५००० ज्ञानेश्वरी वाचक, ३ हजार मृदंगवादक उपस्थित राहणार आहेत. तसेच भारताच्या चारही पिढाचे पिठाधिश्वर जगदगुरू शंकराचार्य, सकल संताचे वंशज, ज्येष्ठ कीर्तनकार, वारकरी व फडकरी यांच्या पवित्र उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा हेाणार आहे. त्यामुळे भव्य दिव्य प्रमाणात होणाऱ्या महा अधिवेशनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभणार आहे.त्यामुळे या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
या बैठकीसाठी श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ समितीचे अध्यक्ष ह. भ. प. संजय पाटील, उपाध्यक्ष ह भ प संजय भागीत, कार्याध्यक्ष हभप डॉ रवींद्र राऊत, संपर्क प्रमुख हभप सुभाष गायकर, ह भ प सुरेश महाराज, ह भ प वसंत काठवले, ह. भ. प. अनंत पाटीलह. भ. प. परशू माळी, ह. भ. प. विवेक म्हात्रे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनासाठी सर्वतोपरी सहकार्य करून, तन मन धनाने काम करण्याचे आश्वासन अजिवली गावातील समितीने दिले.