राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या विविध शाळांतील आंतरशालेय स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी  सहभागी झाले पाहिजे,  तरच आपला देश समृद्ध होईल : विनोद देशपांडे 

डोंबिवली : राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळांचा आंतरशालेय चंद्रशेखर टिळक कथाकथन स्पर्धा, डॉक्टर रघुनाथ माशेलकर बाल वैज्ञानिक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच स्कॉलरशिप मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शनिवारी संस्थेच्या डॉ. हेडगेवार सभागृहा मध्ये ध्रुव आय ए एस अकादमी चे संचालक विनोद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे,कोषाध्यक्ष आनंद रानडे, माजी अध्यक्ष व संस्था सदस्य शशिकांत कर्डेकर हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ध्रुव अकादमीचे संचालक देशपांडे म्हणाले की, शाळा ही लहान लहान गोष्टीतूनच शिकवत असते व त्यातूनच आपण घडत असतो. गणित व विज्ञान हे आपले तर्कशास्त्र विकसित करते , समाजशास्त्र स्वतःला एक ओळख निर्माण करून देते तर भाषा आपली विचारप्रणाली समृद्ध करण्याचे काम करते. तसेच चित्रकला, वक्तृत्व आपले भावविश्व निर्माण करते या सर्वाचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी झाले पाहिजे तरच आपला देश समृद्ध होईल. विविध कलांचा वापर योग्य पद्धतीने करणे हे देशाला दिलेले योगदानच आहे. यातूनच आनंद फुलवणे हेही अपेक्षित आहे. शिक्षण हे केवळ वर्गातून घ्यावे असे नसून या गोष्टीचा सजग भावविश्व समृद्ध करण्यासाठी त्याचा वापर होणे गरजेचे आहे.

शिक्षकांना मार्गदर्शन करताना देशपांडे म्हणाले कृतीयुक्त शिक्षणासाठी क्षमता विकसित होणे गरजेच आहे.मार्कांच्या पलीकडे एक जग आहे हे देखील विद्यार्थ्यांना समजून सांगणे आवश्यक आहे. सध्या स्पर्धा परीक्षांना तोंड देण्याशिवाय पर्याय नाही.स्पर्धेची तयारी करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नवीन आव्हाने स्वीकारण्याची इच्छा शक्ती, एकमेकास मदत करण्याची भावना व ताणतणाव रहित जीवन जगण्याची पद्धत निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. यावेळी डॉक्टर अब्दुल कलाम यांचे उदाहरण देताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांचे भविष्य हे शिक्षक व त्याचे आई-बाबा अशा तीन व्यक्ती घडवू शकतात. यामुळे शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी विविध उदाहरणे दिली पाहिजेत.

यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले की, शिक्षक विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असतातच, त्याचबरोबर कलेला प्रोत्साहन देखील देत असतात .आपल्या शाळेमध्ये कृतीतून शिक्षण दिले जाते .त्याच विद्यार्थ्यांच्या मनात “कुतूहल” निर्माण होणे आवश्यक आहे हेच खरे शिक्षण यातूनच चांगले शास्त्रज्ञ,चांगला व्यक्ती घडू शकतो. शिक्षण व्यवस्था ही “कुतूहलावर” आधारित असावी असे म्हटले. याचबरोबर पुढील वर्षी “आंतरशालेय क्रीडा” स्पर्धा देखील सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना संस्थेचे माजी अध्यक्ष व सदस्य शशिकांत कर्डेकर म्हणाले की, चित्रकार हा खरच भाग्यवान असतो, निसर्गाची पुनर्निर्मिती करण्याची कला त्याच्या अंगी असते. प्रत्येकाने कोणती ना कोणती तरी कलाही जोपासली पाहिजे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड या स्पर्धांमुळे निर्माण होते प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यातूनच एखादा शोध लागतो व अशा गुणवान स्पर्धकांच्या पाठीशी संस्था नेहमीच उभी राहते. आपली संस्था ही सर्वांगीण विकासासाठी कार्य करते.

कार्यक्रमाची सुरुवात विष्णुनगर प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या” मुझको नवल उत्थान दो | माँ शारदे वरदान दो| “या ईशस्तवनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णुनगर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन दत्ताराम मोंडे यांनी त्याचबरोबर विविध स्पर्धांच्या बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन संतोष आवटी,सौ. गीतांजली मुणगेकर व सौ योगिता मानभाव यांनी केले. आभार संस्था प्रतिनिधी व चित्रकला स्पर्धा प्रमुख सौ.माधवी कुलकर्णी यांनी मानले. यावेळी कथाकथन स्पर्धेतील प्राथमिक विभागाच्या ओवी दत्ताराम मोंडे व आरुष देवेंद्र चौधरी या प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या कथा सादर केल्या. कार्यक्रमाची सांगता कुमारी ओवी दत्ताराम मुंडे म्हटलेल्या संपूर्ण वंदे मातरम् गीताने झाली.

  

स्पर्धेतील बक्षिस प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे
१) शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी
पाचवी- तनिष्का प्रशांत इंदुलकर (अरुणोदय प्राथमिक) ,श्रीसाय सुनील नेहते (विष्णुनगर प्राथमिक), आयुष विषाल चौधरी (दत्तनगर प्राथमिक), मृणाल प्रदीप पाटील दत्तनगर प्राथमिक कुमार तेजस पुनित भावे (रामचंद्रनगर इंग्रजी माध्यम)
आठवी- मनवा राजेश पोळेकर (रामचंद्रनगर इंग्रजी माध्यम),नेत्रा प्रमोद फलटणकर (अरुणोदय माध्यमिक).

२) चंद्रशेखर टिळक कथाकथन स्पर्धा
गट १ पहिली व दुसरी-ओवी दत्ताराम मोंडे व आरुष देवेंद्र चौधरी प्रथम क्रमांक(दोघेही विष्णुनगर प्राथमिक), कैवल्य मनोज म्हात्रे, यश प्रशांत महाडिक(दत्तनगर प्राथमिक) वआदित्य अमोल गवळी (अरुणोदय प्राथमिक)द्वितीय, चंचल किरण चौधरी (विष्णुनगर प्राथमिक)तृतीय, दुर्वा मंगेश राऊळ (दत्तनगर प्राथमिक)उत्तेजनार्थ प्रथम व अनिकेत विजय राणे(अरुणोदय प्राथमिक) याने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळविला.
गट २ तिसरी व चौथी -हर्षल संतोष खेडेकर (विष्णुनगर प्राथमिक)प्रथम , जुई संतोष कायसुकर(दत्तनगर प्राथमिक) द्वितीय,स्वरा निखिल वालावलकर (दत्तनगर प्राथमिक)तृतीय,गजेंद्र संजय साठे उत्तेजनार्थ प्रथम व आर्या अजय चौधरी (दोघेही विष्णुनगर प्राथमिक)हिने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळविला.
गट ३ पाचवी ते सातवी -अनुष्का सुधीर राजपुरे (अरुणोदय प्राथमिक)प्रथम क्रमांक, अनामिका अनिल निकम( विष्णुनगर प्राथमिक) द्वितीय, आदित्य साहेबराव सरोदे (गोपाळनगर माध्यमिक) तृतीय, आयुष विषाल चौधरी (दत्तनगर प्राथमिक) उत्तेजनार्थ प्रथम,अक्ष भानुदास नाईक (अरुणोदय प्राथमिक) याने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळविला.
गट क्रमांक ४ आठवी ते दहावी
चैतन्य श्रीपाद दांडेकर (विष्णुनगर)प्रथम क्रमांक
सुजल निर्मल कुमार चौधरी( दत्तनगर) द्वितीय क्रमांक सायली गिरीश जोशी( विष्णुनगर)तृतीय क्रमांक
प्रज्ञा जयराम जोशी (रामचंद्र नगर मराठी) उत्तेजनार्थ प्रथम नेत्रा प्रमोद पाटणकर (अरुणोदय)उत्तेजनार्थ द्वितीय.

चित्रकला स्पर्धेतील बक्षीस प्राप्त विद्यार्थी

गट १ नर्सरी व बालवर्ग
आलिया शाहरुख शेख (रामनगर) प्रथम क्रमांक ,
आरोही राकेश कदम (अरुणोदय) द्वितीय,
सुप्रिया संजय माळी (रामचंद्र मराठी) तृतीय,
चरणसिंग योगेश पाटील (रामचंद्र मराठी) उत्तेजनार्थ प्रथम, आरोही दत्तात्रय मसुरकर( रामनगर ) उत्तेजनार्थ द्वितीय ,

गट क्रमांक २ इ. पहिली व दुसरी
कुमार पार्थ चव्हाण (दत्तनगर ) प्रथम ,
अनुप संजय भांबिड(विष्णुनगर )द्वितीय,
सोहम जगन्नाथ सुतार (रामचंद्र नगर इंग्रजी) तृतीय,
प्रणव मंगेश सुतार( विष्णुनगर) उत्तेजनार्थ प्रथम,
राज रवींद्र भोईर (अरुणोदय) उत्तेजनार्थ द्वितीय.

गट ३ तिसरी व चौथी
लावण्या रमेश बेंद्रे (दत्तनगर) प्रथम,
सेजल नयन वारंग( दत्तनगर) द्वितीय ,
आर्या अजय चौधरी(विष्णुनगर) तृतीय,
प्रगती गणपत सावंत(विष्णुनगर)उत्तेजनार्थ प्रथम,
श्रेयस मंगेश पोयरेकर (अरुणोदय)उत्तेजनार्थ द्वितीय.

गट ४ पाचवी व सहावी
श्रेया वीरेंद्र सोंडकर (विष्णुनगर) प्रथम,
विशाखा अजय सावंत (गोपाळनगर) द्वितीय,
मृणाली युवराज पाटील(अरुणोदय) तृतीय,
नंदिनी तुकाराम चव्हाण(दत्तनगर) उत्तेजनार्थ प्रथम, सोहम महेंद्र चौधरी (रामचंद्रनगर)उत्तेजनार्थ द्वितीय.

गट ५ सातवी व आठवी
मधुरा संतोष शिरवाडकर (अरुणोदय) प्रथम ,
अथर्व आनंद वैशंपायन (विष्णुनगर) द्वितीय,
भूमिका युवराज पाटील (अरुणोदय) तृतीय,
निधी प्रसाद लाड (विष्णुनगर) उत्तेजनार्थ प्रथम आदित्य संतोष शिवगण ( दत्तनगर)उत्तेजनार्थ द्वितीय.

गट ६ इयत्ता नववी व दहावी (फेस पेंटींग)
दक्षता शोधन देशमुख (विष्णुनगर )प्रथम
सृष्टी योगेश शेळके (अरुणोदय) द्वितीय,
रेणुका अनिल सोनवणे (विष्णुनगर) तृतीय,
रिद्धी चंद्रकांत सावंत (रामचंद्र नगर मराठी)उत्तेजनार्थ प्रथम, अथर्व अनंत यादव (दत्तनगर)उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळविला.
याचबरोबर शाळेतील माजी चित्रकला शिक्षिका श्रीमती कुमुदिनी डोके यांज कडून विद्यार्थ्यांना बक्षीस दिली जातात,यातील बक्षीस पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे

गट १नर्सरी व बालवर्ग
भाविषा मानस शिरबावीकर (दत्तनगर) प्रथम,
तेजल चंद्रकांत पाकळे (रामचंद्र इंग्रजी) द्वितीय,
गट २ पहिली व दुसरी
आरुष देवेंद्र चौधरी (विष्णुनगर) प्रथम,
समीक्षा गणेश अंभोरे (रामचंद्र)द्वितीय,
गट ३ तिसरी व चौथी
युतिका रवींद्र कोकाटे (दत्तनगर) प्रथम,
तुषार गोविंद देशमुख (विष्णुनगर) द्वितीय,
गट ४ पाचवी व सहावी
साहिल विलास खेडेकर( दत्तनगर) प्रथम,
शांतीसुधा मारुती नंदयाल(दत्तनगर)द्वितीय,
गट ५ सातवी व आठवी
अथर्व शिवाजी पाटील (विष्णुनगर)प्रथम,
गौरी संदीप चव्हाण( दत्तनगर) द्वितीय,
गट ६ नववी व दहावी
नेत्रा प्रमोद फलटणकर (अरुणोदय) प्रथम,
सायली शिवाजी सावंत( अरुणोदय) द्वितीय क्रमांक मिळविला.
****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *