मुंबई : मुंबईत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे दिल्लीतील निर्भया घटनेची पूनरावृत्ती झाली आहे. साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला आहे. महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून आणखी काही आरोपी सहभागी असल्याचे पोलिसांचा संशय असल्याने पोलीसांचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान मुंबईत घडलेल्या या धक्कादायक घटनेनं राज्यभरात संताप व्यक्त होत आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरात मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. पहाटे साधारण ३ वाजेच्या सुमारास पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता पीडित महिला रक्ताच्या थारोळ्यात आढळली. पोलिसांनी तातडीने सदर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. नराधमांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिच्या गुप्तांगात रॉड घुसवण्याचं अमानवी कृत्य केलं, अशी प्राथमिक माहिती आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि एका आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणात इतरही काही आरोपींचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत.

One thought on “मुंबई हादरली : निर्भयाची पुनरावृत्ती !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!