राणीच्या बागेवर  आता ‘सीसीकॅमेऱ्याची’ नजर :  पालिका सव्वापाच कोटींचा खर्च करणार 
मुंबई –  भायखळा येथील  राणीच्या बागेत मुख्य आकर्षण असलेले पेंग्विन पक्षी तसेच इतर वन्य प्राणी पाहण्यासाठी आणि उद्यानात फेरफटका मारण्यासाठी पर्यटकांची होणारी रोजची अलोट गर्दी यांच्यावर ‘करडी पाळत’ ठेवण्यासाठी येथे सीसीटीव्ही आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसवणार आहे. यासाठी महापालिका सुमारे सव्वा पाच कोटी खर्च करणार  आहे.  येत्या बुधवारच्या स्थायी समितीच्या पटलावर मजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आलाय.
     मुंबई शहर आणि आजुबाजूचे जिल्हे व अन्य राज्यांमधील पर्यटक मोठ्या संख्येने भायखळा येथील  ‘राणीची बाग’ पाहण्यासाठी येत असतात. या प्राणीसंग्रहालयाच्या विशाल परिसरात चोरी, अफरातफर, गैरप्रकार, अपघात व अन्य प्रकारचे गुन्हे व प्राणघातक हल्ले अशा घटना घडण्याची शक्यता असते. म्हणूून तेथे शिस्तबद्ध निरीक्षणाची आवश्यकता आहे. मुंबई पालिकेच्या या विस्तीर्ण क्षेत्राावर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि सार्वजनिक उद्घोषणा व त्यासोबत डिजीटल व्हिडिओ रेकॉर्डर बसवण्यात येणार आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी यांत्रिकी आणि विद्युत विभागाने एकूण सात कोटी ४२ लाख ८३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आणि या कामांसाठी ‘ई निविदा’ मागवण्यात आल्या आहेत. या प्रस्तावासाठी चार कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. यापैकी ‘मे. कॉमटेक टेलिसोल्यूशन्स प्रा. लि’ या कंपनीने पाच कोटी ६४ लाख ६३ हजार ७६६ रुपयांच्या निविदेची यांत्रिकी आणि विद्युत विभागाने शिफारस केली आहे. ही कंपनी कॅमेरा काढणे व परत जोडण्यासह अन्य तांत्रिक कामे करणार आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी यांत्रिकी आणि विद्युत विभागाने पाच कोटी १७ लाख ६६ हजार ५७२ रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!