कल्याण : दीपावली सणानिमित्त एक दिवा माझ्या राजासाठी…या संकलपनेतून शिवाजी विठ्ठल चौगुले या अवलियाने रांगोळीतून “जाणता राजा ” ची प्रतिकृती साकारली आहे. विशेष म्हणजे जाड्या मिठापासून ही रांगोळी काढण्यात आली
पूर्वेतील चिंचपाडा येथे जनाई अपार्टमेंट मधील रहिवाशी शिवाजी विठ्ठल चौगुले यांनी आपल्या घराच्या दरवाज्या समोर दीपावली सणानिमित्त रांगोळीतून “जाणता राजा ” ची प्रतिकृती साकारली आहे. जाड्या मिठापासून ही रांगोळी काढण्यात आली असून यासाठी चार किलो रंग वापरण्यात आला आहे.हि रांगोळी रेखाटण्यासाठी चार तास इतका अवधी लागला. शिवाजी चौगुले हे आरोग्य विभागात कर्मचारी असून, गेल्या आठ वर्षांपासून रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत. पहिल्यांदाच त्यांनी रांगोळी क्या माध्यमातुन जाणता राजा ची छबी साकारली आहे. त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे..