केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचा संघर्षनायक म्हणून गौरव
स्टार महाराष्ट्र अवॉर्ड चे झाले वितरण
मुंबई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा आंबेडकरी जनतेच्या वतीने संघर्षनायक म्हणून गौरव करण्यात आला . शिवाजीमंदिर दादर येथे झालेल्या शानदार सोहळ्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य प्रतिमा आणि संघर्षनायक गौरवपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला . या सत्कार सोहळ्यास आमदार नीलम गोऱ्हे तसेच मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी, आयबीएन लोकमत चे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे, जय महाराष्ट्र चे संपादक तुळशीदास भोईटे, माजी नागरपाल डॉ जगन्नाथ हेगडे, अविनाश महातेकर, डॉ गणेश चंदनशिवे, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले तसेच रिपब्लिकन बाल आघाडीचे नेते जित आठवले, स्वागताध्यक्ष गीता कपूर, गौतम सोनवणे, अॅड मंदार जोशी आणि कार्यक्रमाचे संयोजक हेमंत रणपिसे, श्रुती मनीष पाटील, संजय भिडे नामदेव मोहिते, अरुण पठारे, नैनाताई संजय वैराट, देवेंद्र रणपिसे, मनोज रणपिसे, आरिफ तांबोळी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आठवले यांच्या हस्ते स्टार महाराष्ट्र जीवन गौरव अवॉर्ड चे वितरण करण्यात आले . त्यात समाजसेवेत भरीव योगदान दिल्याबद्दल मुंबईचे माजी नगरपाल डॉ जगन्नाथ हेगडे यांचा तसेच लोककलेत प्रबोधन करणारे आंबेडकरी लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांचा तसेच गीता कपूर, पुरुषोत्तम नाईक आणि मंदा नाईक यांना स्टार महाराष्ट्र जीवन गौरव अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले . तसेच स्टार महाराष्ट्र अवॉर्ड ने पत्रकार सदानंद शिंदे, संदेश काटकर, डॉ सुकेशनी पाटील, तसेच समाजसेविका सुवर्णा डंबाळे, समाजसेवक दळवी दरबार हॉटेल चे मालक फारुख दळवी, रिपाइंचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, प्रल्हाद जाधव, देवेंद्र शेलेकर, रमेश गायकवाड आदींचा स्टार महाराष्ट्र अवॉर्ड ने गौरव करण्यात आला . यावेळी रिपाइं चे सिद्धार्थ कासारे सुनील मोरे सोना कांबळे सचिनभाई मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
असा रंगला सोहळा