अयोध्दा : अयोध्देत राममंदिर झालं आता रामराज्य आणा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मोहन भागवत म्हणाले की, आजचा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही. हा आनंद मिळवण्यासाठी गेल्या 500 वर्षात किती लोकांनी रक्त आणि घाम गाळला. आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत. रामलल्लासोबत भारताचा स्वाभिमान परत आला आहे. देशभरातील छोट्या मंदिरांमध्ये रामभक्तांमध्ये उत्साहाची लाट आहे. मोदींनी आजच्या पूजेसाठी कडक उपवास ठेवला आहे, ते महान तपस्वी आहेत,” अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधानांनी तप केला, आता आपल्यालाही तप करावा लागणार आहे. आपसातील भांडण मिटवावी लागतील. परस्परातील मतभेद, वाद, भांडण सोडून द्याव लागेल. रामराज्यात नागरिक ज्या प्रमाणेच आचरण करायचे. समन्वयाने काम कराव लागेल. सेवा परोपकार भावना महत्त्वाच्या आहेत. सरकारच्या योजनांनी गरीबांना दिलासा मिळतोच आहे. पण जिथे दु:ख, पीडा आहे, तिथे आपण मदतीला गेल पाहिजे, असा संदेश मोहन भागवत यांनी दिला.

महात्मा गांधी म्हणाले होते की पृथ्वी प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे, ती प्रत्येकाचा लोभ पूर्ण करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की आपण लोभी नसावे आपण शिस्तबद्ध राहिले पाहिजे. समाज जीवनात नागरी शिस्तीचे पालन करणे म्हणजे देशभक्ती असे म्हणत सर्वांना एकात्मतेचा संदेश देत सर्वांनी वाणी, मन आणि वचनाने एक होण्याचे आवाहनही सरसंघचालकांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *