भाजपच्या विजया रहाटकर यांची माघार : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध, अधिकृत घोषणेची औपचारिकता
मुंबई : भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवार विजया रहाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झालीय. त्यामुळे नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन (भाजप), कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना) तर वंदना चव्हाण ( राष्ट्रवादी काँग्रेस) हे राज्यसभेवर खासदार निवडून आले असून, केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता उरलीय.
२३ मार्चला ही घोषणा होईल.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. भाजपने चौथा उमेदवारी अर्ज सादर केल्याने निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. भाजपच्या विजया रहाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झालीय.