नारायण राणे, केतकर आणि मुरलीधरन यांचे उमेदवारी अर्ज
मुंबई : माजी मुख्यमंत्री व स्वाभिमान संघटनेचे सर्वेसर्वा नारायण राणे, केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुरलीधरन आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज भाजपकडून उमेदवारी अर्ज सादर केले. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही डमी अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट आदी उपस्थित होते.
काँग्रेसकडून राज्यसभेसाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी विधानभवनात जाऊन अर्ज सादर केले . महाराष्ट्रातून सहा खासदारांची निवड होणार असून येत्या २३ मार्चला राज्यसभेची निवडणूक होणार आहे. सर्वच उमेदवारांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार
वंदना हेमंत चव्हाण – राष्ट्रवादी
डी. पी. त्रिपाठी – राष्ट्रवादी
रजनी पाटील – काँग्रेस
अनिल देसाई – शिवसेना
राजीव शुक्ला – काँग्रेस
अजयकुमार संचेती – भाजप