सुपरस्टार रजनीकांतची राजकीय इनिंग
चेन्नई : सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करीत स्वत:चा पक्ष स्थापन करण्याची घोषणा राजनीकांत यांनी चेन्नईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात केलीय. त्यामुळे रजनीकांत यांची नवीन राजकीय इनिंग सुरू झालीय.
तामिळनाडूत करुणानिधी, जयललिता यांनी अभिनय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात प्रवेश केलाय. आता रजनीकांत यांनी सुध्दा ही परंपरा कायम ठेवलीय. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील समिकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. रजनीकांत यांच्या स्टाईलची फक्त दाक्षिणात्यच नाही, तर देश-विदेशातील प्रेक्षकांवर मोहिनी आहे. त्यांना असलेल्या मोठ्या चाहत्यावर्गाचा राजकीय क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तामीळनाडूतील अनेक गोष्टींमुळे राज्याचे नाव बदनाम झालय ते बदलण्याची गरजन रजनीकांत यांनी व्यक्त केलीय.