…तर गणेशोत्सवात खुशाल डीजे वाजवा : राज ठाकरे
मुंबई : मुंबई हायकोर्टाने गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावर तूर्तास बंदी घातलेली असल्यानं, बुधवारी १९ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करा, पण मंडळांची सहमती असेल तर गणेशोत्सवात खुशाल डीजे वाजवा, असं स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलयं . मुंबई, ठाणे, नाशिकमधील डीजे मालकांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेऊन आपली कैफियत मांडली. ऐन सणासुदीच्या काळात डीजेवर बंदी घातल्यानं आमच्यावर उपासमारीची पाळी आली असल्याचं डीजे मालकांनी राज ठाकरे यांना सांगितलं. या प्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती डीजे मालकांनी त्यांना केली आहे.