राज ठाकरेंची तोफ फडणवीसांवर धडकणार ? आज ठाण्यात जाहीर सभा 

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आज संध्याकाळी सहा वाजता ठाण्यात गडकरी रंगायतनच्या रस्त्यावर जाहिर सभा होत आहे. सकाळपासूनच मनसेकडून जययत तयारी सुरू झालीय. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेच्यावेळी राज यांच्या चर्चगेट येथे मोच्र्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर ठाण्यातील फेरीवाल्यांच्या आंदोलनात मनसेच्या पदाधिका-यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनी मागितलेली १ कोटीची हमी, सुरूवातील राज यांच्या ठाण्यातील सभेला पोलिसांनी दिलेला नकार या पार्श्वभूमीवर राज हे गृहखात्यावर बसरणार असल्याचे बोलले जाते. सध्या गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच हे खातं आहे. सरकारच्या इशा-यावरूनच पोलीस वागत असल्याची टीका राज यांच्याकडून केली जाऊ शकते. त्यामुळे ठाण्याच्या सभेत राज हे फडणवीसांनाच टार्गेट करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील अशोक टॉकीज ते मराठी ग्रंथ संग्रहालय स्टेशन रोड येथे राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयेाजन करण्यात आलं होतं मात्र रहदारीचा रस्ता आणि परिसरातील विविध शासकीय कार्यालय यामुळे रस्त्यात सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. अखेर गडकरी रंगायतन रस्त्यावर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी दिलीय. एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर मनसैनिकांकडून रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी आंदोलन सुरू आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांना पिटाळून लावीत मनसेचे पहिला खळखटयाक केला होता. ठाण्यानंतर कल्याण, डोंबिवली, दादर इतर सर्वच शहरात मनसैनिकांनी फेरीवाल्यांविरोधात दंड थोपटले. पोलिसांनी मनसैनिकांवर गुन्हे दाखल करीत त्यांना अटकही केली. ठाण्यातील पदाधिका-यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून एक कोटी रूपयांची हमी मागितली. मात्र मनसेने नकार दर्शविला आहे. सोमवारपर्यंत कारवाई केली जाणार नाही अशी हमी पोलिसांनी न्यायालयात दिल्याने मनसैनिकांना तात्पुरता दिलासा मिळालाय. या सगळयाचा समाचार राज आपल्या भाषणातून घेण्याची शक्यता आहे. राज यांच्या सभेसाठी मनसेने शहरात फलक लावून त्यावर कोणतेही उत्तर मनसे देईल असं म्हटलय त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय उत्तर देतात याकडंही सर्वांचे लक्ष वेधलंय.
———-

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *