राज ठाकरे यांची सभा ठाण्यात रस्त्यावरच 

ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या १८ नोव्हंबरला ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. अशोक टॉकीज ते मराठी ग्रंथ संग्रहालय स्टेशन रोड येथे  सभेचे आयोजन करण्यात आलय.  सभा रस्त्यावर घेता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेच्यावेळी राज यांच्या चर्चगेट येथे मोच्र्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आहे. गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नाही. सरकारच्या इशा- यावरूनच  हे  सगळ चालल असल्याची टीका राज यांच्याकडून केली जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे राज यांची तोफ गृहखात्यावरच धडकणार असल्याचे समजते.

एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी चर्चगेट येथे भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी राज यांनी रेल्वे प्रशासनाला १५ दिवसाची मुदत दिली होती. मात्र त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांना पिटाळून लावीत मनसेचे पहिला खळखटयाक केला होता. ठाण्यानंतर कल्याण, डोंबिवली, दादर इतर सर्वच शहरात मनसैनिकांनी फेरीवाल्यांविरोधात दंड थोपटले. पोलिसांनी मनसैनिकांवर गुन्हे दाखल करीत त्यांना अटकही केली. तर एक कोटी रूपयांची हमी पोलिसांनी मागितली. या सगळया पार्श्वभूमीवर राज हे ठाण्यात जाहीर सभा घेत आहेत. राज यांच्या सभेसाठी ठाणे पश्चिमेतील अशोक टॉकीजवळील रस्त्यावर अथवा तलावपाळी मार्गावर सभेसाठी मनसेने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र शासकीय कार्यालय आणि रहादारीचा रस्ता असल्याने परवानगी देता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती.  राज यांनी महाराष्ट्रातील पोलिसांचे अनेकवेळा कौतूक केले आहे तसेच सरकारच्या दबावामुळे पोलीस काहीच करू शकत नाही. अन्यथा सगळयांना सुतासारखे सरळ करू शकतील अशी पोलिसांविषयीची भूमिका राज यांनी अनेकवेळा व्यक्त केलीय.   त्यामुळे राज हे ठाण्याच्या सभेत  सरकारवर बरसणार असल्याचे बोलले जाते.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *