ठाकरे – पवारांची भेट ; राजकीयदृष्ट्या महत्वाचीच !
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय. भाजपची घोडदौड रोखण्यासाठीच ठाकरे – पवार हातमिळवणी करणार का ? असाच प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे उद्या शिवाजी पार्कवर राज यांनी जाहीर सभा होणार आहे. त्यामूळ या भेटीला राजकीय दृष्ट्या अधिकच महत्व प्राप्त झालंय.
शोध मराठी मनाचा या पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत खूपच गाजली त्यानंतर आज राज यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. ही भेट राजकीय नसून, पूर्वनियोजित असल्याचे राज यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना  सांगितले असले तरी दोन राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा एकत्रित भेटल्याने चर्चा चांगलीच रंगलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *