डोंबिवली, कल्याणसह ठाणे जिल्ह्यातील कलेक्टर लॅन्डमधील अडचणी : राज यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे ही होते. डोंबिवलीतील कलेक्टर लॅन्ड ची समस्या मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याशी संपर्क साधून नजराणा शुल्क संदर्भात अडचणी सोडवाव्यात अश्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.
पाच दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीच्या दौरा केला होता. या दौरा दरम्यान त्यांनी कल्याण डोंबिवलीतील काही प्रतिष्ठीत नागरीकांसोबत बैठक झाली होती, या बैठकीत डोंबिवलीच्या काही जेष्ठ नागरीकांनी, वास्तू विशारदांनी “कलेक्टर लॅंडचा” मुद्दा उपस्थित करून त्याबाबतीतल्या अडचणी सांगितल्या होत्या. तसेच काही तरुणांनी व्यवसाय उभा करताना इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात येणाऱ्या अडचणी बाबतचा फरक उदाहरणांसह दाखवून दिला होता या दोन्हीं समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन व तोडगा काढण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन राज यांनी दिले होते. त्यानुसारच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. जिल्हाधिका-यांच्या जागावरील मालमत्तांचा पुनर्विकास करतांना भेडसावणा-या कायदेशीर अडचणी सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळात मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, शिरिष सावंत, प्रमोद (राजू) रतन पाटील अनंत मु ओक,धनश्री अ ओक, घनःश्याम ग. जोशी, दिलीपकुमार उत्तेकर, आशीष वैद्य , शिरीष नाचणे, चित्रा शि. पराडकर, अनंत ना. कर्वे, श्रद्धा पाटील, .कुणाल गडहीरे,. राजेश शां कदम, मनोज प्र घरत, सागर र जेधे, राजन द मराठे आदी उपस्थित होते.
*स्टार्ट अप पॉलिसीबाबत लवकरच घोषणा*
महाराष्ट्रातील मराठी तरूण उद्योजकांसाठी लवकरच पॉलिसी जाहीर करु असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले.