राज ठाकरेंच्या आगमनाने मनसैनिकांमध्ये उत्साह

डोंबिवली ( संतोष गायकवाड) : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे डोबिवलीत आगमन झाल्यानंतर मनसैनिकांनी त्यांचे जल्लाोषात स्वागत केले. राज ठाकरे यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी नगरसेवक आणि मनसैनिकांनी गर्दी केली होती.  सकाळी नऊ वाजता राज यांचे डोंबिवली जिमखान्यात आगमन झाले. राज यांनी पांढ-या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परीधान केला होता. दिवाळीनंतर राज ठाकरे डोंबिवलीत येणार याची उत्सुकता मनसैनिकांना लागली होती. त्यामुळे सकाळपासूनच राज यांच्या आगमनासाठी मनसैनिक व पदाधिका-यांनी गर्दी केली हेाती. राज यांनी प्रत्यक्षात नगरेसवक आणि पदाधिका-यांशी संवाद साधल्याने  सगळयांच्या चेह- यावर आनंद पसरला होता. लोकसभा विधानसभा आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र तरीसुध्दा मनसेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकत्यांनी शहरातील अनेक प्रश्न उचलून धरले होते.  आठवडाभरापूर्वीच फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आंदोलन केल्याप्रकरणी ११ मनसैनिकांना एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली हेाती.  राज यांच्या आगमनामुळे मनसैनिकांमधील  मरगळ नाहीशी होऊन उत्साह संचारला होता.

2 thoughts on “राज ठाकरेंच्या आगमनाने मनसैनिकांमध्ये उत्साह”
  1. Nashik maddhey ghadavlela badal sampurna mumbait aani maharastrat ghadun yeu det MNS dwarey hetch swapna aamchey

  2. We Dombivlikars want to c u (Raj Saheb) as our future CM…
    Your words should hv actions….
    Dream for Maharashtra which u hv shown d young generation that should b only realised when our party will come back into force.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *