“बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे भरपूर वाचन करा!”
– राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या हस्ते मालाडमध्ये मनसेच्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेचं शानदार उदघाटन.

मुंबई  : “डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे पुस्तकं वाचली त्याप्रमाणे तुम्ही विद्यार्थ्यांनी भरपूर पुस्तकं वाचा, अभ्यास करा, सुशिक्षित व्हा” असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. मालाडच्या कुरार व्हिलेजमधील आप्पापाडा येथे मनसेने सुरू केलेल्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि अभ्यासिकेचं त्यांच्या हस्ते आज रविवारी दुपारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भर पावसात राज ठाकरे येणार म्हणून हजारो तरुण-महिला उपस्थित होत्या. “हे ग्रंथालय म्हणजे मनसेचा एक स्तुत्य उपक्रम आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा”, असं आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केलं. ​

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *